दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) चांदवड तालुक्यातील दिघवद व मौजे उर्धुळ गावच्या सरपंचांनी घेतली खासदार भास्करराव भगरे विविध कामांसाठी भेट दिघवद सरपंच रावसाहेब गांगुर्डे व उर्धुळ गावच्या सरपंच सौ कविताबाई ठाकरे यांचे पती श्रीहरी ठाकरे यांनी दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्करराव भगरे यांची त्यांच्या निवासस्थानी कार्यालयात भेट घेऊन दिघवद गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी शेड करणे तसेच फेवर ब्लॉक बसवणे व कॉंक्रिटीकरण करणे गावातील शेड करणेबाबत व सोयाबीन विक्रीवर प्रति क्विंटल1500रुपये अनुदान मिळणे, रासायनिक खताला सबसिडी मिळावी व खतांचे दर कमी करणे कांदा, द्राक्षे यांना निर्यात शुल्क 0 टक्के करणे तसेच येवला गुजरात महामार्ग क्रमांक 25हा दिघवद गावातुन न घेता गावाच्या बाहेरून घेण्यात यावा घरकुलाची मंजुरी करून लवकरात लवकर अदा करणे असे दिघवदचे सरपंच रावसाहेब गांगुर्डे यांनी निवेदन दिले तर मौजे उर्धुळ हनुमान मंदिर परिसर व चौकात पेव्हर ब्लॉक बसवणे व कॉंक्रिटीकरण शोभिकरण करणे चांदवड तालुका मालेगाव मध्ये समावेश करू नये नाशिक जिल्ह्यात ठेवावा तशेंच चांदवड तालुक्यातील काही गावे दत्तक घेण्याचा विनंती केली व जल जिवण योजना लवकरात लवकर चालू करावी व मतदार संघात येण्याची विनंती सरपंच रावसाहेब गांगुर्डे श्रीहरी ठाकरे व प्रताप गांगुर्डे यांनी केली व निवेदन देण्यात आले यावेळी खासदार भास्करराव भगरे यांनी जिल्हा निर्मिती होईल तेव्हा पाठपुरावा करू असे सांगितले.



चांदवड तालुक्यातील दिघवद सरपंच रावसाहेब गांगुर्डे व श्रीहरी ठाकरे यांनी दिले विविध कामांसाठी निवेदन छाया दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे