चांदवड येथे जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याची मागणी

चांदवड – कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यात जेष्ठ नागरिकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याबाबत आणि जेष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष स्थापन करण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. हे निवेदन चांदवड पोलीस ठाण्याचे एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांना देण्यात आले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. निकम टी. पी., चांदवड तालुका अध्यक्ष शंकराव निखाडे, माजी अध्यक्ष अशोक काका व्यवहारे, चांदवड शहर अध्यक्ष बाळासाहेब शेळके, हरसूल अध्यक्ष गोपीनाथ खैरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सहाय्यता कक्ष सुरू करणे अनिवार्य आहे. यामुळे जेष्ठ नागरिकांना मदत मिळेल तसेच त्यांच्या समस्या तातडीने सोडवण्यास हातभार लागेल.

यावेळी उपस्थितांनी जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजनांची मागणी केली. पोलीस प्रशासनाने तत्काळ समिती स्थापन करून सहाय्यता कक्ष कार्यान्वित करावा, अशी मागणी करण्यात आली.

पोलीस महासंचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार हा उपक्रम हाती घेतल्यास जेष्ठ नागरिकांना आधार मिळेल आणि त्यांच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

पत्रकार -

Translate »