रसायनशास्त्राचे प्राध्यापक श्री केशव बबन गांगुर्डे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) : दिघवद गावचे भुमिपुत्र व सध्या विद्या प्रसारक मंडळ किन्हवली संचलित, अरविंद ( आप्पासाहेब ) भानुशाली कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किन्हवली ता. शहापूर जि. ठाणे येथील रसायनशास्त्राचे प्राध्यापक श्री केशव बबन गांगुर्डे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी महात्मा गांधी विद्यामंदीर संचलित, लोकनेते व्यंकटराव हिरे पंचवटी महाविद्यालय येथील रसायनशास्त्र संशोधन केंद्रातील संशोधक मार्गदर्शक डॉ. दिलीप घोटेकर व डॉ. विष्णू आडोळे यांच्या मार्गदर्शानाखाली “सिंथेसिस अँड अँटिमायक्रोबियल ॲक्टिव्हीटी ऑफ ॲझॉल बेस्ड हेटोरसायकल्स” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला.

सदर संशोधनावर आधारित त्यांचे एकुण तीन लेख आंतरराष्ट्रीय स्तरावरिल ELSEVIER व SPRINGER सारख्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या यशाबद्दल त्यांचे …… महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कस फेडरेशन संघटना चांदवड विभाग अधिकारी व कर्मचारी तसेच वर्कस फेडरेशन विद्युत कर्मचारी सहकारी पतसंस्था चांदवड सभासद व कर्मचारी रुंद / ग्रामपंचायत दिघंवद / समस्त ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले 💐🎊

पत्रकार -

Translate »