तब्बल 15 वर्षांनंतर दिघवद विद्यालयात भरला 2009-2010 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)-श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ दिघवद संचलित स्वामी विवेकानंद विद्यालयात इयत्ता दहावी सन -2009-2010 बॅचचे विद्यार्थी तब्बल पंधरा वर्षानंतर शाळेत एकत्रित आले.
आवडते मज मनापासूनी शाळा!लावीते लळा जशी माऊली बाळा!
ह्या ऊक्ती प्रमाणे शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांच्या नंतर संस्काराची शिदोरी देणारी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. आपण ज्या शाळेत शिकलो मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आजही आपल्या आयुष्यातून जात नाही हे सत्य आहे. ह्याच पार्श्वभूमीवर शाळेबरोबर असणारे आपले ऋणानुबंध अधिक दृढ व्हावे. आपण ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेला आणि त्या शाळेतील गुरुजनांना भेटून आपल्या आठवणींना उजाळा द्यावा या उद्देशाने वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या या सर्व माजी विद्यार्थ्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. अनेक माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातुन शाळा तसेच गुरुजनांविषयीच्या गोड आठवणींना उजाळा दिला. यावेळेस संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ,चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे,सरपंच रावसाहेब गांगुर्डे तसेच अनेक शिक्षक उपस्थित होते.त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,माजी मुख्याध्यापक रमण खुटे,उमाकांत वारके,आप्पा पवार,दगा पवार,वसंत जाधव,रामकृष्ण चित्ते संस्थेचे विद्यमान संचालक तसेच शिक्षक सदाशिव गांगुर्डे,उपशिक्षक सुरेश सोनवणे,शशिकांत पाटील,किशोर गांगुर्डे,सुनिल गांगुर्डे आदी उपस्थित होते.शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्रित आणून कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये विशाल जाधव,कल्पना खुटे,स्वाती काळे,रुचिरा काळे,संदीप जाधव,वैभव गाडे यांचे मोलाचे योगदान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी विद्यार्थी योगेश हिरे,सुचिता थोरात यांनी केले.तसेच उपस्थित सर्वांचे आभार स्वाती काळे व चैताली गांगुर्डे यांनी मानले.यावेळी अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.त्यामध्ये सोमनाथ गागरे,विकी कासव, पुनम गोसावी,समाधान तांबडे,सतीश शिंदे,जयश्री गाडे,प्रदीप मोरे,संदीप मापारी,सविता मापारी,विकास राहणे,सागर गांगुर्डे,माया पवार,वैशाली गाढे,समाधान पवार,कल्पना खुटे,वैशाली जाधव,योगेश शिंदे,कृष्णा तासकर,समाधान ठोके,बुद्धभूषण पगारे, सुवर्णा मापारी,अमोल खांगळ,रवींद्र जाधव,सागर गांगुर्डे,महेंद्र केदारे,सागर ठाकरे,सुरेखा गांगुर्डे,जयश्री आरतनूर,संगीता गांगुर्डे,ज्योती ठाकरे,मोनाली गांगुर्डे,केदारनाथ शिंदे,सुवर्णा मुंजाळ,मनीषा गांगुर्डे,रमेश पवार,शितल खुटे,अर्चना वाघ,प्रियंका गोडसे,कविता हांडगे,विमल हांडगे,पुनम गांगुर्डे,कविता हिरे,सुनंदा आहेर,अमोल गांगुर्डे,शंकर ठाकरे,सुनील हांडगे,निलेश मापारी रोशन हांडगे,माया पवार,सागर राजनोर आदी माजी विद्यार्थी मेळाव्यास हजर होते.

पत्रकार -

Translate »