दहिवड येथे खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दहिवड येथे परमपूज्य स्वामी परमेश्वरानंद गिरी महाराज व परमपूज्य गणेशानंद महाराज यांच्या हस्ते खंडेराव महाराज म्हाळसा भानाई मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हा कार्यक्रम साडेतीन दिवसाच्या सप्ताहात आयोजित करण्यात आला होता शनिवार रोजी सकाळी मांडव दुपारी मिरवणूक काढण्यात येऊ विविध पूजन करण्यात आले यावेळी मंदिराचे व वास्तुपूजन घटस्थापना आधी पूजन करण्यात आले रविवारी सकाळी पुरोहितांच्या व आलेल्या महंतांच्या मंत्र जपा द्वारे जंगलु बच्छाव होम हवन करण्यात आले यावेळी विविध प्रकारचे देवदेवतांची स्थापना दीपक बच्छाव नंदू बच्छाव ज्ञानदेव बाबा कडू बाबा व महानतांच्या हस्ते करण्यात आले सोमवारी स्वामी परमेश्वर महाराज हरिद्वार व गणेश जी महाराज पुरी पुजारी दीपक बच्छाव यांच्या हस्ते मूर्ती स्थापना करण्यात आली यानंतर नंदू बच्छाव गोपाळ बच्छाव केवळ बच्छाव रोशन बच्छाव समाधान बच्छाव ज्ञानदेव बाबा यांनी ध्वज पूजन केले तर महापूजेसाठी सज्जन बच्छाव भाऊसाहेब बच्छाव रघुनाथ मोरे हेमंत चंदन पप्पू ब्राह्मण कार गेनू बाबा मोरे गंभीर साबळे योगेश बच्छाव रोशन बच्छाव या पती-पत्नी द्वारे पूजन करण्यात आले यानंतर दहिवड गावातुन भव्य मिरवणूक वाजतगाजत फटाक्यांची आतषबाजी भंडाऱ्याची उधळण देवांवरून करण्यात आली व विविध पुजण करुन महाआरती करण्यात आली यावेळी आलेल्या सनेहिनां दिपक बच्छाव व नंदलाल बच्छाव परिवाराने महाप्रसाद व स्नेहभोजन देण्यात आले यावेळी आलेल्या महंत साधू संत भक्त व दहिवड परिसरातील ग्रामस्थ यांचे स्वागत जंगलु बच्छाव व ग्रामस्थांनी अभिनंदन केले यावेळी देवळा कळवण चांदवड मालेगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील महंत साधू संत भक्त व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

पत्रकार -

Translate »