महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था संचलित संत ज्ञानेश्वर विद्यालय व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय वाहेगाव साळ तर्फे लेफ्टनंट भाऊसाहेब खैरे यांचा सत्कार

काजीसांगवी उत्तम आवारे: चांदवड तालुक्यातील विद्यालयात वाहेगाव साळचे भूमिपुत्र, राष्ट्रपतीमार्फत लेफ्टनंट पदावर पदोन्नती झालेले भाऊसाहेब किसन खैरे यांचा आज विद्यालयात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला . लेझीम नृत्याच्या गजरात प्रथम मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे शिक्षक श्री मनोज विसपुते यांनी शब्दसुमनांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून अध्यक्ष पदाची सूचना मांडली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय श्री अरुण माळी हे होते.
महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्था व स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय वाहेगाव साळ तर्फे मा. श्री एन एस मंडलिक साहेब यांचे हस्ते लेफ्टनंट भाऊसाहेब खैरे यांचा सत्कार करण्यात आला. लेफ्टनंट श्री भाऊसाहेब खैरे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच याप्रसंगी त्यांच्या पत्नी सुवर्णाताई देखील उपस्थित होत्या त्यांचा देखील विद्यालयाच्या शिक्षिका पवार व्हि.डी. यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माननीय भाऊसाहेब खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राथमिक शिक्षण अतिशय दुर्गम भागात वाहेगाव साळ सारख्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण घेत शेतकरी कुटुंबात अतिशय गरीब परिस्थिती असताना तसेच परिवारात कुठलेही मार्गदर्शन नसताना देखील शिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात शिपाई पदावर रुजू झालेले भाऊसाहेब खैरे यांनी देशात वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना कारगिल युद्धामध्ये देखील आपली सेवा दिलेली आहे आणि आपल्या या 30 वर्षाच्या सेवेनंतर भारताच्या राष्ट्रपती मार्फत त्यांची लेफ्टनंट पदावर पदोन्नती झाली . ही केवळ वाहेगाव साठी नव्हे तर तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे . आपले मनोगत व्यक्त करीत असताना लेफ्टनंट भाऊसाहेब खैरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण केली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एन एस मंडलिक यांनी आपले मनोगत व्यक्त करीत असताना भाऊसाहेब खैरे यांचे भरभरून कौतुक केले व हा सत्कार एक अविस्मरणीय सत्कार असल्याचे नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांना देखील वेळेचे महत्व याप्रसंगी सांगितले व विद्यार्थ्यांनी या सत्कारातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले
कार्यक्रमासाठी महात्मा फुले सांस्कृतिक कला क्रीडा व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री एन एस मंडलिक, उपाध्यक्ष श्री अरुण माळी, संचालक श्री एन एम पवार, श्री बाजीराव खैरे, श्री पोपटराव सोमवंशी, आदी मान्यवर तसेच निलेश खैरे , विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री देवढे के डी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

