नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची यशस्वी सापळा कारवाई – तलाठीसह खाजगी एजंट लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी 3 मार्च 2025 रोजी चांदवड तालुक्यातील तलाठी आणि एका खाजगी एजंटला लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईत आरोपींनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती.

घटना कशी घडली?

तक्रारदार (वय 33) यांनी तक्रार दाखल केली होती की, ज्ञानेश्वर एकनाथ बरकले (वय 34, व्यवसाय-खाजगी एजंट, रा. परसुल, ता. चांदवड, जि. नाशिक)विशाखा भास्कर गोसावी (वय 37, व्यवसाय- तलाठी, शेलु सजा, ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी वारसा हक्काने वाटणी झालेल्या शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी 8000/- रुपयांची लाचेची मागणी केली. तडजोडीनंतर लाचेची रक्कम 4000/- रुपये निश्चित करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी क्रमांक एक व दोन यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. आरोपींच्या अंगझडतीत प्रत्येकी एक मोबाइल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासणी सुरू आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची प्रभावी कारवाई

या प्रकरणी चांदवड पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7अ आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कारवाईमध्ये सहभागी अधिकारी:

  • मार्गदर्शन:
    • मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर
      (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परीक्षेत्र)
  • सापळा अधिकारी / दाखल अधिकारी / तपास अधिकारी:
    • श्री. संतोष पैलकर (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक)
  • सापळा पथक:
    • पो.हे.कॉ. दिनेश खैरनार, अविनाश पवार
    • चालक – पोलीस शिपाई परशुराम जाधव

सर्व नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना:

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खाजगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी किंवा न करण्यासाठी लाचेची मागणी केल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे संपर्क साधावा.

संपर्क क्रमांक:

टोल फ्री क्रमांक: 1064

भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्या, तक्रार करा आणि पारदर्शक प्रशासनासाठी सहकार्य करा!

पत्रकार -

Translate »