सोनीसांगवी येथे महिला दिनानिमित्त 33 महिलांना सवलतीत शिलाई मशीन वाटप

पत्रकार उत्तम आवारे काजीसांगवी: जागतिक महिला दिनानिमित्त सोनीसांगवी येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात महिलांचे महत्त्व व त्यांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकण्यात आला. सोनीसांगवीचे उपसरपंच प्रविण ठाकरे यांनी महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणावर भाष्य करत त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे आयोजन सोनीसांगवीच्या सरपंच सौ. अलका ठाकरे, उपसरपंच श्री. प्रविण ठाकरे आणि कन्या मल्टीपर्पस सोसायटीच्या अध्यक्षा राधिका गायकवाड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने 33 सुशिक्षित व गरजू महिलांना सवलतीच्या दरात शिलाई मशीन वाटप करून त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रमास श्री. बबन ठाकरे, अरूण ठाकरे, संजय ठाकरे, अजय बनकर, कुसुम घंगाळे, मनीषा माळी, सोनी पवार, शैला सोनवणे, कुसुम ठाकरे, जयश्री ठाकरे, पुष्पा ठाकरे, सीमा ठाकरे, वर्षा ठाकरे, हिराबाई ठाकरे, सुषमा ठाकरे, कावेरी ठाकरे आणि सुनिता शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक महिला उपस्थित होत्या.

महिला सक्षमीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल
या उपक्रमामुळे गावातील महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी मिळणार असून त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारता येईल. महिलांनी या संधीचा लाभ घेत आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला. -उत्तम आवारे

सोनीसांगवी ग्रामपंचायतीच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

“समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण अनिवार्य आहे. महिलांनी सक्षम बनून स्वतःच्या पायावर उभे राहावे, त्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे ठरतात. ग्रामपंचायत आणि कन्या मल्टीपर्पस सोसायटीच्या या पुढाकारामुळे अनेक महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल. याचा फायदा घेऊन महिलांनी स्वतःच्या कुटुंबासह संपूर्ण समाजाच्या विकासात योगदान द्यावे.”- संपादक

पत्रकार -

Translate »