जागतिक महिला दिनानिमित्त दिघवड विद्यालयात स्त्री शक्तीचा जागर

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार):श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय, दिघवद येथे जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचा जागर साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि पोलीस उपनिरीक्षक वृषाली गांगुर्डे या अध्यक्षस्थानी होत्या.

कार्यक्रमास संस्थेचे चिटणीस अण्णासाहेब गांगुर्डे, उपाध्यक्ष दत्तात्रय गांगुर्डे, शाळा समिती अध्यक्ष साहेबराव गांगुर्डे, संचालक तसेच शिक्षक सदाशिव गांगुर्डे, नानाभाऊ गांगुर्डे, बनुबाई गागरे, अशोकराव ठाकरे, तसेच शाळेचे माजी विद्यार्थी गणेश निंबाळकर, उमेश निंबाळकर, किरण गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

महिला सशक्तीकरणाचे प्रेरणादायी सादरीकरण

विद्यालयातील विद्यार्थिनींनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर आदी क्रांतिकारी महिलांच्या वेशभूषा परिधान करून त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. यामध्ये ईश्वरी झाल्टे, धनश्री गांगुर्डे, निवेदिता केदारे, श्रेया झाल्टे, अनुष्का गांगुर्डे, अक्षदा केदारे, जान्हवी हांडगे या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

प्रेरणादायी मार्गदर्शन व मनोगत

कार्यक्रमात वीरेन पगार आणि शिक्षिका रमा नगरारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात वृषाली गांगुर्डे यांनी महिलांच्या यशोगाथांचा उल्लेख करत त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार हर्षाली भामरे यांनी मानले.

मान्यवरांची उपस्थिती

कार्यक्रमास मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी, पर्यवेक्षक इंद्रभान देवरे, उपशिक्षक सुरेश सोनवणे, किशोर गांगुर्डे, अर्जुन गांगुर्डे, शशिकांत पाटील, सुनील गांगुर्डे, प्रभाकर पेंढारी, अमोल ठोंबरे, संदीप पाटील, गणेश गांगुर्डे, सुनील चंदनशिव, मधुकर गोसावी, सागर गांगुर्डे, धनंजय गांगुर्डे, साहेबराव घोलप, तसेच शिक्षिका कलुबाई साबळे, रेणुका कानडे, सुनिता राठोड आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »