काजी सांगवी (पत्रकार उत्तम आवारे):जिल्हा परिषद शाळा, सोग्रस या शाळेने नवोदय प्रवेश परीक्षेत यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. या शाळेतील विद्यार्थी सार्थक धनेश मेचकुल याची जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव येथे इयत्ता ६ वी साठी निवड झाली आहे.

जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत ग्रामीण आणि शहरी भागातील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी केवळ ८० विद्यार्थ्यांची निवड झाली असून, सार्थक हा त्यात आपले स्थान मिळवणारा एकमेव विद्यार्थी ठरला आहे.

सार्थकच्या यशामध्ये शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, नियोजित अभ्यासक्रम पूर्ती, नियमित सराव चाचण्या, विषयवार विश्लेषण आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यांचा मोठा वाटा आहे. विशेषतः अभ्यासिकेतील रात्रभर अभ्यास, शेकडो प्रश्नपत्रिकांचा सराव आणि प्रत्येक घटकाचे सखोल समज यामुळे हे यश शक्य झाले.

सार्थक याला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, वर्गशिक्षक जाधव सर तसेच श्रीकांत देवरे सर यांचे सतत मार्गदर्शन लाभले. शाळेच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सर्व शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थांनी सार्थकचे अभिनंदन केले आहे.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »