काजीसांगवीः उत्तम आवारे कै.एन.के.ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे शिक्षक-पालक मेळावा विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी साधक-बाधक विचारांती संपन्न झाला.
या पालक मेळाव्याचे अध्यक्षस्थान शा.स.अध्यक्ष ॲड. दौलतराव ठाकरे यांनी भुषविले. याप्रसंगी मंचावर शा.व्य.स.चे अध्यक्ष सुनीलजी ठाकरे तसेच शा.स.सदस्य शरदजी सोनवणे,बाबासाहेब ठाकरे,नितीन सोनवणे,वाल्मीक पठाडे,प्रभाकर सोनवणे,प्राचार्य जिभाऊ शिंदे,पर्यवेक्षिका सीमा वारके विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व पालक याप्रसंगी उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालक मेळाव्याचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका सीमा वारके व शिक्षक मनोगत उपशिक्षक सिताराम खुटे यांनी केले.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षीच्या नवीन शिक्षक-पालक संघाची स्थापना केली असता उपाध्यक्ष राजेश सोनवणे,सहसचिव सोपान पवार, सदस्य योगेश काळे, साहेबराव चव्हाण यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीच्या दृष्टिकोनातून विविध सूचना व उपाय योजना सुनील काळे पत्रकार, रामनाथ दवंगे,बाबुराव कुंभार्डे ,नितीन ठाकरे,संदीप ठाकरे ,नानासाहेब पठाडे,विलास ठाकरे ,संजय सोनवणे,विनायक ठाकरे,योगेश ठोके,प्रभाकर सोनवणे,ज्ञानेश्वर ठाकरे,त्र्यंबक पवार या पालकांनी मांडल्या.
सर्व पालकांनी मांडलेल्या सूचनांना विद्यालयाचे प्राचार्य श्री जिभाऊ शिंदे सर यांनी उत्तरे देऊन प्रत्येकाच्या शंकेचे निरसन करून जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टिकोनातून कार्यरत्व व प्रयत्नशील रहाण्याचा शब्द दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.दौलतराव ठाकरे यांनी पालकांना आवाहन केले की खाजगी शाळांचा पैसा कमविणे हा उद्देश असून त्यांच्या भुलथापांना बळी न पडता बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदाप्रमाणे सर्वच घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे काम ही शाळा करते असे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या पालक मेळाव्याचे नियोजन समिती प्रमुख मोतीराम काळे यांनी मा.प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाने केले. सूत्रसंचालन माणिक कुंभार्डे यांनी केले.
अशाप्रकारे सर्वच शालेय घटकांच्या सहकार्याने शिक्षक पालक मेळावा संपन्न झाला.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »