कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)चांदवड तालुक्यात विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे सांगता व प्रारंभ होत आहे श्रावण महिन्यात विशेष करून पवित्र मानला जातो या महिन्यात घरोघरी पोथी पुराण पारायणे केली जाते तर सप्ताहाचे आयोजन हे नागपंचमीच्या दुसर्यां दिवसांपासून सुरू होते तर काही सप्ताहाचे आयोजन गोकुळाष्टमी या कालावधीत होतात आज विविध ठिकाणी सप्ताहाची सांगता झाली असून तालुक्यात चांदवड दिघवद निंबाळे निमोन विटावे पाथरशेंबे आदि गावात झाली आहे तर गोकुळ अष्टमी ला भरविर पाटे पन्हाळे दैहिवद आदि ठिकाणी सुरुवात होणार आहे आज दिघवद येथे सालाबादप्रमाणे सप्ताहाचे ४७ वर्ष पूर्ण झाले असुन या सप्ताहात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेत तर बदल घडवून आणले आहे रोज ७ते९या वेळ केली व किर्तनात नंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले रोज सतराशे ते अठराशे भाविकांनी लाभ घेतला या कार्यक्रमाला जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील थोर किर्तनकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वारकरी संस्थेचे विद्यार्थी सह संस्थेचे संस्थापक अर्जुन गांगुर्डे यांनी विशेष सहकार्य केले यावेळी गावातील सातही वाड्यांनी भोजनाची व आर्थिक व्यवस्था करण्यात आली आज काल्याच्या कीर्तनाचे आयोजन हरिभक्त परायण संजय महाराज दुकळे यांनी केले व सप्ताहाची सांगता करण्यात आले या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद ग्रामपंचायत सरपंच व सदस्य तसेच तंटामुक्ती समितीचे सदस्य व अध्यक्ष गावातील विविध क्षेत्रातील व तरुण मित्र मंडळ यांनी सहकार्य केले या कार्यक्रमाला विशेष सहकार्य सप्ताह कमिटीचे सदस्यांनी परिश्रम घेतले.