कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): दिघवद .बहीण भावाच्या या सुंदर
नात्याचा रक्षाबंधन हा श्री नेताजी सुभाष चंद्र बोस सीबीएससी गुरुकुल वाहेगाव साळ यांनी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आनंदात व उत्साहात साजरा केला. माननीय डॉ बाबुराव फकीरराव पवार मंडळाचे संस्थापक डॉक्टर प्रतापराव पवार,सचिव, डॉक्टर वैशालीताई पवार यांच्या मार्गदर्शना अंतर्गत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता विद्यार्थ्यांनी जय हिंद म्हणत सर्व अधिकाऱ्यांना अभिवादन केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राख्या बनवल्या होत्या. त्या राख्या विद्यार्थिनींनी लासलगाव पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी व सहकर्मचारी यांना बांधल्या कारण पोलिस आपले खरे रक्षक आहेत .लासलगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी विद्यार्थ्यांना योग्य तसेच अयोग्य वागणूक काय आहे याचे मार्गदर्शन केले. त्याचबरोबर आपल्या जीवनातील स्वतःचे रक्षण कसे करावे, याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. यामुळे विद्यार्थ्यांना खूप मोलाची माहिती तसेच पोलिस बनण्याची प्रेरणा मिळाली.
यावेळी शाळेच्या पर्यवेक्षिका सौ नीलिमा योगेश हिंगमिरे यांनी रक्षाबंधनाची गोष्ट विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली व या कार्यक्रमासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शाळेच्या परिसरातील वृक्षांना रक्षासूत्र बांधून झाडे वाचवा हा संदेश विद्यार्थ्यांनी देण्याचा प्रयत्न केला
