कै.एन.के.ठाकरे जनता विद्यालय काजीसांगवी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांची ७५० वी जयंती उत्साहात साजरी
..
काजीसांगवी उत्तम आवारे: गुरुवार दि.१४ ऑगस्ट २०२५ रोजी काजीसांगवी विद्यालयात सुरुवातीस शालेय विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींची सुंदर अशी वेशभूषा केली होती. बॅंडपथक,टाळकरी ,विणेकरी,माऊलींची पालखी व संपूर्ण शालेय परिवार याक्रमाणे काजीसांगवी गावातून टाळ-वाद्यांच्या गजरात पालखी सोहळ्याची सुरुवात प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांच्या पालखी पूजनाने झाली.व पर्यवेक्षक श्री.शिर्के सर ,शिक्षक-शिक्षिका ,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पूजन केले.
संत ज्ञानेश्वर माऊली यांचे अभंग गायन करत काजीसांगवी येथील चौकात गावातील भावीक भक्तांनी पूजन व सामूहिक आरतीचा आनंद घेत,ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जयघोष केला. विद्यार्थिनींनी फुगडी खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी आपल्या काजीसांगवी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.उबाळे सर ,पोलिस पाटील सरपंच,उपसरपंच ,सदस्य,विविध सोसायटी चेअरमन व सदस्य , सभासद ,पत्रकार बंधू विविध क्षेत्रातील शिक्षणप्रेमी तथा वारकरी भावीक -भक्त उत्साहाने सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या अभंगाविषयी प्रा.हर्षदा आहेर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर माहिती दिली. विजयानंद महाराज सोनीसांगवी यांनीही आपल्या अमृतवणीतून विद्यार्थ्यांना अभंग व ओव्या अभ्यासण्यासाठी आवाहन केले. विद्यालयात उपस्थित सर्वांनी व गितमंचणे पसायदान गायले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्री.जिभाऊ शिंदे सर यांनी केले तर सूत्रसंचालन श्री.कुंभार्डे सर यांनी केले व उपस्थितांचे आभार श्री.कोल्हे सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शालेय घटकांचे सहकार्य लाभले.

