कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): नाशिक तालुक्यातील सिध्द पिंपरी ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा आर. आर. (आबा) पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करून या ग्रामपंचायतीने ‘सुंदर गाव’ पुरस्कार पटकावला.
राज्यात ग्रामस्वच्छता अभियान आणि महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजनेत गावांचे स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपारिक उर्जा आणि पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर असे 100 गुणांच्या आधारे गुणांकन केले जाते ते योजना सुरु करुन त्या प्रभावीपणे सिध्द पिंपरी ने राबविल्या. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन स्मार्ट ग्राम योजनेस,आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कार त्यांचे नाव देण्यात आले आहे
कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक‌ रोडच्या आयुक्त कार्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सरपंच भाऊसाहेब बाळकृष्ण ढिकले ग्रामविकास अधिकारी श्री,गांगुर्डे भाऊसाहेब व ग्रामपंचायत सदस्य यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२४-२५ या वर्षासाठी आर. आर. पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार योजना राबविण्यात आली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील सिध्द पिंपरी ग्रामपंचायतने हा पुरस्कार पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या प्रशासक यांच्या स्वाक्षरीने आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे प्रमाणपत्र सिद्ध पिंपरी करांना बहाल करण्यात आले.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »