काजीसांगवी विद्यालयात भारत स्काऊट गाईड अंतर्गत आनंद मेळावा जल्लोषात संपन्न

0

काजीसांगवी विद्यालयात भारत स्काऊट गाईड  अंतर्गत आनंद मेळावा जल्लोषात संपन्न

काजीसांगवीः उत्तम आवारे मराठा विद्या प्रसारक समाजाचे , कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, काजीसांगवी येथे भारत स्काऊट गाईड अंतर्गत घेतला जाणारा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात म.वि.प्र.  चे जेष्ठ सभासद गंगाधर बाबा  ठाकरे(गुरुजी)यांनी श्रीफळ वाढवून केली. पालक – शिक्षक समिती चे अध्यक्ष दशरथ ठोंबरे यांनी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. व्यासपीठावर गंगाधर बाबा ठाकरे (गुरुजी) , माजी सभापती जयराम ठोके , पत्रकार दशरथ ठोंबरे,रमेश शिंदे , मविप्र सेवक संचालक जगन्नाथ निंबाळकर, प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर , पर्यवेक्षक सुभाष पाटील, जेष्ठ शिक्षक अर्जुन आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयातील ५ वी ते १० वी च्या काही  विद्यार्थ्यांनी अनेक प्रकारचे स्टॉल लावले.त्यात  कुळदाची जिलेबी,पुरण- पोळी,पाव- भाजी,ओली भेळ,मसाला पाव,पाव वडा,वडा पाव,इडली – सांबर,भजी,पोहे, मिठाई चे पदार्थ , भाजीपाला असे विविध पदार्थ विक्रीस ठेवले. 

बाकीच्या विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थांचा मनमुरादपणे आनंद घेतला.  उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या धडपदीचे खूप कौतुक केले व विविध स्टॉल वरून अनेक प्रकारचे पदार्थ खरेदी केले. यात विद्यार्थ्यांना खरेदी विक्री चे चांगले  अनुभव आले.   एकूणच विद्यालयातील आनंद मेळावा आनंदमय वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे नियोजन स्काऊट – गाईड प्रमुख सीताराम खुटे यांनी  केले. तसेच  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक – शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »