शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन: कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी
कै.नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न
काजीसांगवीः (उत्तम आवारे पत्रकार) मराठा विद्या प्रसारक समाजाचे कै. नरहरपंत कारभारी ठाकरे जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात वाजता शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन व विज्ञान रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घघाटक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सेवक संचालक मा.श्री.जगन्नाथ निंबाळकर हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून लोकमत वर्तमानपत्राचे वार्ताहर उत्तम आवारे व कृषीन्यूज.com चे संपादक किशोर सोनवणे ,प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर,पर्यवेक्षक सुभाष पाटील,कला शिक्षक श्रीकांत तवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य चित्तरंजन न्याहारकर होते. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयातील विज्ञान प्रेमी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने वैज्ञानिक प्रतिकृती सादर केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समाधान कोल्हे यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील विज्ञान शिक्षक अर्जुन आहेर,ज्ञानेश्वर चव्हाण,दिगंबर पाटील ,चिमाजी गायकवाड यांनी परिश्रम घेतले.