जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

0

 जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात  साजरी.

Uploading: 140511 of 140511 bytes uploaded.

  काजीसांगवीः (उत्तम आवारे)

              मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय काजीसांगवी  येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक  चित्तरंजन न्याहारकर व पर्यवेक्षक सुभाष  पाटील यांच्या  हस्ते दोन्ही युगपुरुषांचे  प्रतिमापूजन करण्यात आले.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर सर होते.

            व्यासपीठावर मुख्याध्यापक चित्तरंजन न्याहारकर ,पर्यवेक्षक सुभाष पाटील, जेष्ठ शिक्षक हरिभाऊ कुंभार्डे,अर्जुन आहेर,जगन्नाथ निंबाळकर, सतिश महाले,दर्शना न्याहारकर,शोभा जाधव उपस्थित होते.

       याप्रसंगी  विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यात अबोली ठोके,साक्षी तळेकर,गौरी शिंदे,प्रियंका निंबाळकर,ओम ठाकरे,अक्षदा पठाडे,साक्षी आवारे,गौरी काळे,कुणाल काळे,शुभम ठाकरे,मिनाक्षी आवारे,पायल ठोंबरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

         विद्यालयातील जेष्ठ शिक्षक माणिक कुंभार्डे यांनी आपल्या मनोगतात जहाल मतवादी, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेहमी अग्रेसर असणारे तसेच इंग्रजांना सळो  की पळो करून सोडणारे क्रांतिकारक बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांना कडक शब्दात सांगितले की’ स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ तसेच देशातील सर्व समाजाने एकत्र यावे यासाठी त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती अशा प्रकारचे उत्सव  सुरू केले.लोकशाहीर, साहित्यरत्न, मराठी माणसाची अस्मिता जपणारे, शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून रशिया पर्यंत पोहोचवणारे शाहीर, तसेच” माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होतेय कायली”अशा प्रकारच्या अनेक लावण्या, पोवाडे, पटकथा लिहिणारे साहित्यिक अण्णा भाऊ साठे यांची आज जयंती आहे. त्यांचे गुण आपण सर्वांनी अंगीकारले पाहिजेत असे आपल्या मनोगतात सांगितले.

         अध्यक्षीय भाषणात न्याहारकर सर म्हणतात, विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा. शाळेचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांनी   प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला पाहिजे .विद्यालयातील सर्व उपक्रम साजरे करण्यामागे हाच महत्त्वाचा उद्देश असतो.नंतर त्यांनी दोन्ही युगपुरुषांना विनम्र अभिवादन केले.  

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन १०वी(अ)ची विद्यार्थिनी निलम ठाकरे हिने केले. तर आभार पायल ठोंबरे हिने मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी  सांस्कृतिक कमिटी प्रमुख समाधान कोल्हे यांनी तसेच सर्व शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी तसेच  विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »