किटकनाशके

0

किटकनाशके

कीटकनाशके व कीडनाशके : केवळ किटकांच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी जी रसायने असतात, त्यांना कीटकनाशके असे म्हणतात. उदा.कार्बारील, डाय मेथोएट इत्यादी. याउलट कीडनाशके ही संज्ञा व्यापक असून, पिकावरील कोणत्याही शत्रुला मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनाला कीडनाशके असे म्हणतात. किडनाशकांमध्ये किटकनाशकांचा अंतर्भाव होतो. किडनाशकांची उदाहरणे झिंक फॉस्फाईड, स्ट्रीकनीन, मेटाल्डीहाईड, केलथेन इत्यादी आहेत.

किटकनाशकांची बाजारात उपलब्ध असलेली प्रारुपे : किडीच्या नियंत्रणासाठी किटकनाशकाचे मूलद्रव्य वापरणे योग्य व हितावह नाही, तेव्हा या क्रियाशील घटकांचे प्रमाण मोठ्या क्षेत्रावर समान प्रमाणात फवारण्यासाठी त्याची प्रारुपे मिळतात. ती प्रारुपे खालीलप्रमाणे आहेत.
१) भुकटी : यात मुळविष ०.६५ ते १० टक्क्यांपर्यंत असते. अशा किटकनाशकांचा वापर जेथे पाण्याचे दुर्भिक्ष असते, अशा ठिकाणी केला जातो. उदा. मिथील पॅराथिऑन, १० टक्के कार्बारील.
२) पाण्यात विरघळणारी भुकटी : यात मुळविष ५० ते ८५ टक्केपर्यंत असते. प्रारुप पाण्यात मिसळून फवारता येते, कार्बारील ५० टक्के डब्ल्यू.डी.पी., गंधक ८० टक्के जलद्राव्य, ॲसीफट ७५ टक्के.
३) प्रवाही प्रारुप : यात मूळ विषांचे प्रमाण २० ते ५० टक्केपर्यंत असते. हे प्रारुप पाण्यात विरघळून फवारणी करता येते. उदा. मॅलाथियान ५० ई.सी., फेनव्हेलरेट २० ई.सी.
४) दाणेदार प्रारुप : या प्रारुपाचे कण मोठे असतात व त्यात मूळ विषाचे प्रमाण ३ ते १० टक्के असते. या प्रारुपाचा वापर जमिनीत टाकण्यासाठी करतात. सर्वसाधारणपणे आंतरप्रवाही औषधे या प्रारुपात मिळतात, थायमेट १० टक्के, कार्बोफ्युरान ३ टक्के.
किटकनाशकांचा वापर: किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या किटकनाशक औषधाचा योग्य तिव्रतेचा फवारा मारणे आवश्यक आहे. द्रावणाची तिव्रता कमी झाल्यास कीड मरणार नाही व जास्त झाल्यास त्याचे अनिष्ठ परिणाम होतील.
फवारा तयार करण्यासाठी लागणारे कीटकनाशक (मिली/ग्रॅम)
=
फवाऱ्याची अपेक्षित तीव्रता फवारणीसाठी घेतलेले पाणी (लि.)x१०००
बाजारात मिळणाऱ्या औषधांची (प्रारुपता) तिव्रता
उदा. डायमिथोएट ३० टक्के प्रवाही औषधाची ०.०३ टक्के तीव्रतेची फवारणी करावयाचे झाल्यास व फवारणीसाठी १० लि. पाणी वापरावयाचे झाल्यास १० मि.ली. डायमिथोएट लागेल.
लागणारे डायमिथोएट
=
०.०३ १० १०००
=
१० मि.ली.
३०
टीप : पॉवर स्प्रेअर (स्वयंचलित फवारणी यंत्र) वापरावयाचे असल्यास औषध तीनपट टाकावे.
किटकनाशकांची निवड
किटकनाशकांची निवड किटकाच्या खाण्याच्या पद्धती नुसार किंवा किटकांच्या तोंडाच्या रचनेनुसार त्या किडींसाठी किटकनाशकांची उपाययोजना करावी लागते. सर्वसाधारणत: किटक पाने कुरतडून खात असतात. तेव्हा पान कुरतडणाऱ्या अळ्या किंवा इतर किटकांच्य नियंत्रणासाठी उदरविष किंवा जठरविष प्रभावी ठरते तर रसशोषण करणाऱ्या किडींचया नियंत्रणासाठी आंतरप्रवाही विष किंवा स्पर्शविष अधिक परिणामकारक असते. तेव्हा किटकनाशक निवडण्यापूर्वी पिकांवर कोणत्या प्रकारची किड आहे व त्या किडीच्या खाण्याची पद्धत कोणती आहे हे पाहूनच किटकनाशक औषधांची निवड करावी.
किटकनाशक व रोगनाशक औषधी कशी हाताळावीत♥प्रगतशील शेतकरी♥
♥आधुनिक रोगनाशके व किटकनाशके इतर विषारी आहेत की, त्यांचा योग्य रितीने वापर न केल्यास माणूस व इतर पाळीव जनावरे यांच्या जीवीतास धोका पोहोचतो.
♥त्यासाठी अशा औषधांपासून सावधगिरी बाळगण्याच्या दृष्टीने पुढील सूचना काळजीपूर्वक पाळाव्यात.
♥ सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर मोठ्या अक्षरामध्ये त्या औषधाचे नाव घालून ती औषधे थंड व कोरड्या जागी कुलुपामध्ये सुरक्षित ठेवावीत.
ती मुलाबाळाच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
♥ किटकनाशक व रोगनाशक औषधांच्य पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्यात.
तसेच किटकनाशक औषधे असलेल्या बाटल्यांची झाकणे सावकाश उघडावीत.
♥ बऱ्याच वेळा पिकावर फवारण्याचे औषध आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो.
म्हणून त्यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
♥ खाद्यपदार्थ, इतर औषधे व लहान मुले यांच्याशी औषधांचा संपर्क येऊ देऊ नये.
♥ औषध मारण्याच्या कामासाठी हातापायांवर जखम झालेल्या माणसाची निवड करु नये कारण जखमेवाटे या विषारी औषधांचा शरीरामध्ये शिरकाव होऊन धोका पोहोचण्याचा संभव असतो.
♥ फवारण्याचे मिश्रण किंवा उंदरांसाठी विषारी गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, रिकामे डबे अगर बाटल्या घरगुती कामासाठी (उदा.गोडतेल, पाणी इत्यादी साठी) न वापरता जमिनीमध्ये खोल पुराव्यात व धातुची भांडी साबण, सोडा व माती यांनी स्वच्छ धुवून घ्यावीत.
♥ डब्यातून अगर बाटलीतून औषध काढतांना त्यात नळी घालून तोंडाने वर ओढू नये.
शक्यतो हातात रबरी हातमोजे घालावेत.
♥ औषधांचे मिश्रण तयार करण्याचे अथवा फवारण्याचे काम चालू असतांना खाणे, पिणे अगर धूम्रपान करु नये.
नाहीतर औषध पोटात जाण्याचा संभव असतो.
तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण अगर कचरा फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा.
♥ किटकनाशक औषध तयार करतांना व फवारतांना जरुर ते शरीर संरक्षक कपडे व उपकरणे वापरावीत.
♥ शक्यतो पिकांवर फवारण्याचे मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लागडी काठी वगैरे वापरावी.
♥ भाजीपाला अगर जनावरांचा (कोबी, लसूण व गवत) वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान १५ दिवस तरी खाण्यामध्ये येऊ नये, त्याचप्रमाणे स्वच्छ धुवून घ्याव्यात.
♥ शक्यतो औषध फवारण्याचे काम एकाच माणसाकडून सतत करुन न घेता पाळीपाळीने करुन घ्यावे.
त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी हे काम न करता सकाळी व संध्याकाळी करावे.
♥ औषध फवारणी वाऱ्याच्य दिशेने करावी म्हणजे हे औषध पिकांवर चांगले पसरते.
तसेच नाका-तोंडावाटे हे औषध पोटात जाण्याचा संभव टळतो.
♥ फवारण्याचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने व पाण्याने स्वच्छ धुवावे.
♥ पेरणीनंतर किटकनाशक व बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया केलेले बियाणे शिल्लक राहील्यास खाण्याकरीता वापरु नये. ते जाळून अथवा जमिनीत पुरुन टाकावे.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
♥साधनांचा वापर करणाऱ्या व्यक्तीने लक्षात घ्यावयाच्या गोष्‍टी
♥ औषध फवारणी किंवा धुरळणी झाल्यावर साधन स्वच्छ करुन तपासणी करावी. साधनातील औषध पूर्णपणे निघून गेले आहे, याची खात्री करावी, कारण शिल्लक राहिलेल्या औषधापासून विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
♥ शेतावर औषध फवारण्यासाठी जात असतांना साधनांचे सुटे भाग आणि हत्यारे बरोबर घ्यावीत म्हणजे औषधाचा वापर चालू असतांना साधनामध्ये काही दोष निर्माण झाल्यास त्याची दुरुस्ती करता येणे शक्य होईल.
♥ सामान्यत: वॉशर्स, नोझल, रबरी पाईप्सच्या क्लिप्स, स्पार्क प्लग्ज, स्क्रू ड्रायव्हर्स, पाने इत्यादी बरोबर घ्यावेत.
♥ जेव्हा अनेक साधने एकाचवेळी शेतात वापरली जातात, त्यावेळेला एक-दोन जादा साधने शेतावर नेणे आवश्यक ठरते. असे केल्याने एखादे साधन बंद पडल्यास वेळेचा अपव्यय होत नाही.
♥ औषध फवारण्यासाठी गळक्या साधनांचा वापर करु नये. अशा साधनांमुळे वापरणाऱ्याला इजा होऊ शकते. तसेच पिकालाही धोका संभवतो.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
संकलित!
♥किटकनाशक मिश्रण योग्यता तक्ता
किटकनाशके                 
मॅलेथिऑन किटकनाशक मिश्रण योग्यता तक्ता♥प्रगतशील शेतकरी♥
(शेतकरी, सल्लागार वा कृषीकेंद्रा करिता उपयुक्त माहिती, मॅलेथिऑन किटकनाशकात काय मिसळावे व काय मिसळू नये यासाठी उपयोगी तक्ता वापरुन  होणारे संभाव्य नुकसान टाळु शकतात!)
♥मॅलेथिऑन + पॅराथिऑन = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + कार्बारील = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + वेटेबल सल्फर = मिसळावे,
♥मॅलेथिऑन  +  कॅप्टन = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + पायरेथ्रम = मिसळावे,
♥मॅलेथिऑन + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
♥मॅलेथिऑन +  बोर्डो मिश्रण = मिसळू नये,
♥मॅलेथिऑन + फोसॅलोन = मिसळू नये,
संकलित!
पॅराथिऑन किटकनाशक मिश्रण योग्यता तक्ता♥प्रगतशील शेतकरी♥
(शेतकरी वा कृषीकेंद्रा करिता उपयुक्त माहिती, पॅराथिऑन किटकनाशकात काय मिसळावे व काय मिसळू नये यासाठी उपयोगी तक्ता वापरुन  होणारे संभाव्य नुकसान टाळु शकतात!)
♥पॅराथिऑन + मॅलेथिऑन = मिसळावे,
♥पॅराथिऑन + पॅराथिऑन = मिसळावे,
♥पॅराथिऑन + कार्बारील = मिसळावे,
♥पॅराथिऑन + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
♥पॅराथिऑन + वेटेबल सल्फर = मिसळावे,
♥पॅराथिऑन  +  कॅप्टन = मिसळावे,
♥पॅराथिऑन + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
♥पॅराथिऑन + पायरेथ्रम = मिसळावे,
♥पॅराथिऑन + फोसॅलोन = मिसळावे,
♥पॅराथिऑन +  बोर्डो मिश्रण = मिसळू नये,
♥पॅराथिऑन + मोनोक्रोटोफॉस = मिसळतांना काळजी घ्या, आठ तासाच्या आत फवारणी
संकलित!
♥कार्बारील + मॅलेथिऑन = मिसळावे,
कार्बारील + पॅराथिऑन = मिसळावे,
कार्बारील + कार्बारील = मिसळावे,
कार्बारील + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
कार्बारील + वेटेबल सल्फर = मिसळावे,
कार्बारील  +  कॅप्टन = मिसळावे,
कार्बारील + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
कार्बारील + पायरेथ्रम = मिसळावे,
कार्बारील + फोसॅलोन = मिसळावे,
कार्बारील + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
कार्बारील +  बोर्डो मिश्रण = मिसळू नये,
♥कॉपर ऑक्सी क्लोराईड + कार्बारील = मिसळावे,
कॉपर ऑक्सी क्लोराईड + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
कॉपर ऑक्सी क्लोराईड + वेटेबल सल्फर = मिसळावे,
कॉपर ऑक्सी क्लोराईड + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळतांना काळजी घ्या, दोन औषधांचे केलेले मिश्रण ताबडतोब वापरावे. मिश्रण तयार केल्यावर बराच वेठ ठेवले तर रासायनिक गुणधर्म कमी होतात. झायरमबरोबर मिश्रण असल्यास 450 लिटर मिश्रणात 250 मि.ली. मलई काढलेले दूध (सेपरेटेड मिल्क) टाकावे म्हणजे रासायनिक गुणधम कमी होणार नाहीत.
कॉपर ऑक्सी क्लोराईड  +  कॅप्टन = मिसळू नये,
कॉपर ऑक्सी क्लोराईड +  बोर्डो मिश्रण = मिसळू नये,
कॉपर ऑक्सी क्लोराईड + पायरेथ्रम = पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
कॉपर ऑक्सी क्लोराईड + फोसॅलोन = पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
कॉपर ऑक्सी क्लोराईड + मोनोक्रोटोफॉस = पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
कॉपर ऑक्सी क्लोराईड + मॅलेथिऑन = पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
कॉपर ऑक्सी क्लोराईड + पॅराथिऑन = पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
♥वेटेबल सल्फर + मॅलेथिऑन = मिसळावे,
वेटेबल सल्फर + पॅराथिऑन = मिसळावे,
वेटेबल सल्फर + कार्बारील = मिसळावे,
वेटेबल सल्फर + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
वेटेबल सल्फर + वेटेबल सल्फर = मिसळावे,
वेटेबल सल्फर + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
वेटेबल सल्फर +  बोर्डो मिश्रण = मिसळावे,
वेटेबल सल्फर + पायरेथ्रम = मिसळावे,
वेटेबल सल्फर + फोसॅलोन = मिसळावे,
वेटेबल सल्फर + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
वेटेबल सल्फर  +  कॅप्टन = मिसळू नये,
♥कॅप्टन + मॅलेथिऑन = मिसळावे,
कॅप्टन + पॅराथिऑन = मिसळावे,
कॅप्टन + कार्बारील = मिसळावे,
कॅप्टन + वेटेबल सल्फर = मिसळावे,
कॅप्टन  +  कॅप्टन = मिसळावे,
कॅप्टन + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
कॅप्टन +  बोर्डो मिश्रण = मिसळावे,
कॅप्टन + पायरेथ्रम = मिसळावे,
कॅप्टन + फोसॅलोन = मिसळावे,
कॅप्टन + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
कॅप्टन + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळतांना काळजी घ्या, दोन औषधांचे केलेले मिश्रण ताबडतोब वापरावे. मिश्रण तयार केल्यावर बराच वेठ ठेवले तर रासायनिक गुणधर्म कमी होतात. झायरमबरोबर मिश्रण असल्यास 450 लिटर मिश्रणात 250 मि.ली. मलई काढलेले दूध (सेपरेटेड मिल्क) टाकावे म्हणजे रासायनिक गुणधम कमी होणार नाहीत.
♥मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + मॅलेथिऑन = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + पॅराथिऑन = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + कार्बारील = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळू नये,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + वेटेबल सल्फर = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब  +  कॅप्टन = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब +  बोर्डो मिश्रण = मिसळतांना काळजी घ्या, दोन औषधांचे केलेले मिश्रण ताबडतोब वापरावे. मिश्रण तयार केल्यावर बराच वेठ ठेवले तर रासायनिक गुणधर्म कमी होतात. झायरमबरोबर मिश्रण असल्यास 450 लिटर मिश्रणात 250 मि.ली. मलई काढलेले दूध (सेपरेटेड मिल्क) टाकावे म्हणजे रासायनिक गुणधम कमी होणार नाहीत.
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + पायरेथ्रम = मिसळू नये,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + फोसॅलोन = मिसळावे,
मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
♥बोर्डो मिश्रण + वेटेबल सल्फर = मिसळावे,
बोर्डो मिश्रण  +  कॅप्टन = मिसळावे,
बोर्डो मिश्रण + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
बोर्डो मिश्रण +  बोर्डो मिश्रण = मिसळावे,
बोर्डो मिश्रण + पायरेथ्रम = मिसळावे,
बोर्डो मिश्रण + मॅलेथिऑन = मिसळू नये,
बोर्डो मिश्रण + पॅराथिऑन = मिसळू नये,
बोर्डो मिश्रण + कार्बारील = मिसळू नये,
बोर्डो मिश्रण + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळू नये,
बोर्डो मिश्रण + फोसॅलोन = मिसळू नये,
बोर्डो मिश्रण + मोनोक्रोटोफॉस = मिसळू नये,
♥पायरेथ्रम + मॅलेथिऑन = मिसळावे,
पायरेथ्रम + पॅराथिऑन = मिसळावे,
पायरेथ्रम + कार्बारील = मिसळावे,
पायरेथ्रम + वेटेबल सल्फर = मिसळावे,
पायरेथ्रम +  कॅप्टन = मिसळावे,
पायरेथ्रम + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
पायरेथ्रम +  बोर्डो मिश्रण = मिसळावे,
पायरेथ्रम + पायरेथ्रम = मिसळावे,
पायरेथ्रम + फोसॅलोन = मिसळावे,
पायरेथ्रम + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
पायरेथ्रम + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळू नये,
♥फोसॅलोन + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
फोसॅलोन + वेटेबल सल्फर = मिसळावे,
फोसॅलोन + मॅलेथिऑन = मिसळू नये,
फोसॅलोन + पॅराथिऑन = मिसळू नये,
फोसॅलोन + कार्बारील = मिसळू नये,
फोसॅलोन + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळू नये,
फोसॅलोन  +  कॅप्टन = मिसळू नये,
फोसॅलोन +  बोर्डो मिश्रण = मिसळू नये,
फोसॅलोन + पायरेथ्रम = मिसळू नये,
फोसॅलोन + फोसॅलोन = मिसळू नये,
फोसॅलोन + मोनोक्रोटोफॉस = मिसळू नये,
♥मोनोक्रोटोफॉस + मॅलेथिऑन = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + पॅराथिऑन = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + कार्बारील = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + कॉपर ऑक्सी क्लोराईड = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + वेटेबल सल्फर = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस  +  कॅप्टन = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + मॅनेब, थायरम, झायनेब, मॅनकोझेब = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस +  बोर्डो मिश्रण = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + पायरेथ्रम = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + फोसॅलोन = मिसळावे,
मोनोक्रोटोफॉस + मोनोक्रोटोफॉस = मिसळावे,
O : मिसळावे,            x : मिसळू नये,           * : मिसळतांना काळजी घ्या,
1. दोन औषधांचे केलेले मिश्रण ताबडतोब वापरावे. मिश्रण तयार केल्यावर बराच वेठ ठेवले तर रासायनिक गुणधर्म कमी होतात. झायरमबरोबर मिश्रण असल्यास 450 लिटर मिश्रणात 250 मि.ली. मलई काढलेले दूध (सेपरेटेड मिल्क) टाकावे म्हणजे रासायनिक गुणधम कमी होणार नाहीत.
2. पाण्यात विरघळणारी पावडर वापरावी.
3. औषधाचे मिश्रण आठ तासाच्या आत फवारणी साठी वापरावे.
सुचना : बियाण्याला 0.3 टक्के थायरब बुरशीनाशक प्रथम चोळावे आणि नंतर रायझोबियम कल्चर लावावे.
कीटकनाशकांची व्यापारी नावे
इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी
प्रोक्लेम, डेरिम, ओेलेक्स, हिलक्लेम, तत्काळ, सफारी
अल्फामेथ्रीन १० ईसी प्रवाही
स्टॉप, जेम, अल्फागार्ड, कॉनगार्ड, डेल्थान, टाटाअल्फा, अल्फामेक, अल्फाक्युअर, नायक
ऑक्झीडिमेटॉन मिथाईल २५ ईसी
मेटॉसिस्टॉक्स, झेन्टॉक्स, मॅसिटॉक्स
ॲसिफेट ७५ एसपी
असाटाफ, फिल्डमार्शल, टामरानगोल्ड, लोड, ऑसिफा, स्टारथेन, ऑसोमिल, ऑसाविप, लान्सर, ट्रीमोर, टीनगार्ड, मिलटाफ, चेतक,
ॲसिटामेप्रिड २० एसपी
प्राईड, माणीक, लिफ्ट, रेकॉर्ड, शार्प, मुद्रा, पोलार, नाईज
बायफेनथ्रीन १० टक्के प्रवाही
टालस्टार, सुपरस्टार, प्लेअर, डिसेक्ट
बुप्रोफेझीन २५ ईसी
ॲपलॉड, तोरण, ब्लेझ, फेनटॉम, काल,बुप्रोलॉड
क्विनॉलफॉस २५ ईसी
इकालक्स, फ्लॅश, बेरुशील, वज्र, कीनालक्स, सुक्विन, क्विनॉलटॉफ, कुश, क्विनगार्ड, मिलक्स,
क्लोरपायरीफॉस २० ईसी
डर्सबान, त्रिशुल, रडार, क्लोरगार्ड, क्लोरवीप, फोर्स, ट्रायसेल, क्लोरोसन, क्लासिक, लिथल, क्लोरोसील,
क्लोरपायरीफॉस ५० ईसी
लिथल सुपर ५५०, बॉश,
सायपरमेथ्रीन २५ टक्के प्रवाही
बासाथ्रिन, सिबील, रुद्र, सायपरसान, सिंबुश, सापरगार्ड, सूपर फाईटर, कोब्रा, सायरस
सायपरमेथ्रीन १० टक्के प्रवाही
सापरमार, स्टार सायप्रीन, रीपकॉर्ड, अंकुश, फेनसान, सायपरमील, उस्ताद
कार्बारील ५० डब्ल्यु.पी.
सेव्हिन, हेक्साबिन
कार्बोफ्युरान ३ टक्के जी.
फुराडान, हेक्साफुरान, फ्युराक्लार, फ्युरॉन, हॉमर
कार्बोसल्फान २५ डि.सी.
मार्शल
कार्बोसल्फान २५ टक्के प्रवाही
मार्शल, पोझी,
क्लोथिनियाडीन ५० टक्के डब्यू.डि.जी.
डेन्टॉप, डेन्टासू
कारटॅप हायड्रोक्लोराईड ५० एसपी
पदान, केल्डान, कंपास, कारटॉक्स, बेकॉन एसपी, कार्बान
कारटॅप हायड्रोक्लोराईट ४%जीआर
बेकॉन जीआर, कार्बन, कारडॅन ४ जी
डेल्टामेथ्रीन २.८ टक्के प्रवाही
डेसिस, डिकामेथ्रीन, डेकागार्ड
डायकोफॉल १८.५ ईसी
केलथेन, डिफॉल, हिम्फोल, कोलोनेल- एस
डायक्लोरव्हास ७६ ईसी
नुवान, वॉपोन, डुम, सुक्लोर, व्हॅन्टॉफ, लुहोन, कोच
डायमेथोएट ३० टक्के प्रवाही
रोगोर, हेक्सागोर, सुलगोर
डायफेनथुरॉन ५० डब्ल्यु.पी.
पोलो, पेगासस, रुबी, डिक्लेअर
इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू. एस.
गाऊचो, टाटामिडा
इमिडाक्लोप्रीड ७० डब्ल्यू.जी.
ॲडमायर, ॲटम प्लस, टेर्नर, व्हिक्टर प्लस, सेनसेक्स गोल्ड
इमिडाक्लोप्रीड १७.८ एस.एल.
टाटामिडा, कॉन्फीडॉर, ॲटम, व्हिक्टर, सुनर, सिमर, मिडा, इमीग्रीन, इमीडा गोल्ड, चेमिडा, इमिडा सेल, महाराजा, सनसेक्स
इमिडाक्लोप्रीड ३०.५ एससी
व्हिक्टर सुपर, रेक्स
इन्डोक्झाकार्ब १४.५ टक्के
अवॉन्ट, धावा, स्टीवार्ट, दक्ष, क्विनडोक्झा, अव्वल, यमराज
इथोफेनप्रॉक्स १० टक्के प्रवाही
पुंकासो, न्युकिल, ट्रेबोन
इथीऑन ५० टक्के प्रवाही
लेझर, इन्डोथिऑन, इथीओसूल, फॉसमाईट, मिट ५०५, निलमाईट, टाफेथिऑन
फेनव्हलरेट २० टक्के प्रवाही
बीलफेन, सुमिसीडीन, लुफेन, फेनकिल
फेनिट्रोथीऑन ५० टक्के प्रवाही
सूमिथिऑन, फॉलिथीनऑन, फेनिट्रोसूल
फेनप्रोपाथ्रिन १० टक्के प्रवाही
डानिटॉल
फेनप्रोपाथ्रिन ३० टक्के प्रवाही
मिथोथीन
फेनथीऑन ५० टक्के प्रवाही
लिबॉसिड, मरकापटोफॉस
फ्लोनिकॅमीड ५० टक्के डब्ल्यु जी 
उलाला
फ्ल्युवालिनेट २० टक्के प्रवाही
मावरिक
फोरेट १० जी.
थिमेट, मिलेट, लुफेट, जी-४, १० जी, युमेट
फोसॅलॉन ३५ टक्के प्रवाही 
झोलोन, होल्टोन
फिप्रोनिल ५ एससी
रिजेंट, महावीर, सारजंट, स्टालकर, रेफरी, युनीप्रो
फिप्रोनिल ०.३ टक्के जीआर
स्टालकर जीआर, रेफरी जीआर
फेनथोएट ५० टक्के प्रवाही
अमेस, धानूसान
फ्ल्युबेनडायअमाईड २० डब्ल्युजी.
टाकूमी, ईनव्हेड
फ्ल्युबेनडायअमाईड ३९.३५ टक्के प्रवाही
फेम
लिंडेन २० टक्के प्रवाही
लिन टाफ, कॉनोलीन, स्टार लिंडेन
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ५ ईसी
रिवा, कराटे, एजंट प्लस, रूद्रा, ब्रॉव्हो ५०००, संत्री
लॅमडा- सीहॅलोथ्रीन २.५ ईसी
सामूराय
लॅमडा- सीहॅलोथ्रीन ४.९ सीएस
मिट्रो
मिथोमिल ४० एसपी
लॅनेट, डुनेट, डॅश
मॅलॅथिऑन ५० टक्के प्रवाही
सायथिऑन, मॅलमर, मालटेक्स, हिल्थोऑन, सल्मॉथीऑन
मिथिल पॅरिथिऑन २ टक्के भुकटी
फॉलिडॉल, मेटासीड
मिथिल पॅरिथिऑन ५० टक्के प्रवाही
मेथासिड
मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एसएल
नुवाक्रॉन, मोनोसील, मोनोफॉस, हिलक्रॉन, बलवान, लुफॉस, सुफॉस, मिलफॉस, फॉसकिल, गार्डीयन, मोनोमार
नोवालूरॉन १० ईसी प्रवाही
रिमॉन, युनीरॅान
प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी
क्यूरॅक्रॉन, कॅरीना, सेलक्रॉन, प्रहार, प्रोफेक्स, प्रबल, बॅन्जो, सिमक्रॉन
प्रोपारगाईट ५७ ईसी
मास्टामाईट, ओमाईट, इंडोमाईट, प्रोगार्ड
रायनाक्झीपार २० एस.सी.
कोराजेन
स्पिनोसॅड ४५ टक्के एस.सी.
ट्रेसर, स्पिनटॉर, कॉन्झर्व, सक्सेस
स्पिनोसॅड २.५ टक्के एस.सी.
सक्सेस
थायमिथॉक्झाम ७० डब्ल्यू.एस.
क्रुझर, कव्हर, स्पेर
थायमिथॉक्झाम २५ डब्ल्यू जी
ॲक्टरा, ॲरो, क्लिक, स्लेअर, रिनोवा
थायोडिकार्ब ७५ टक्के पा.वि.भु.
लार्वीन, सर्वीन
ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही
होस्टॉथिऑन, सुटाथिऑन, टायटन, जोश, ट्रायझोसेल, चार्म, त्रिकोन, टायटन, सरताज, ट्रायझो
ट्रायझोफॉस ३५ टक्के +
डेल्टा मेथ्रीन १ टक्का
डेफॉस, स्पार्क, शार्क, सरपंच
क्लोरोपायरिफॉस ५० टक्के + सापरमेथ्रीन ५ टक्के
मेगा ५०५, टेरर, नुरल-डि, न्युरेल, केनॉन, इम्पाला, हामला, क्लोरोथीन, हमला, सायक्लोन
क्लोरोपायरिफॉस १६ टक्के + आल्फामेर्थीन १ टक्का
आफलातून, वायपर, रिव्हे
प्रोफेनोफॉस ४० टक्के +
सायफरमेथ्रीन ४ टक्के
हिटसेल, पॉलेट्रीन-सी, बॅन्जो सुपर, डायरेक्ट
सापरमेथ्रीन ३ टक्के प्रवाही +  क्वीनॉलफॉस २० टक्के
विराट, सापरक्विन
ॲसिफेट ५० टक्के +
इमिडाक्लोप्रीड १.८ टक्के एस पी
लान्सरगोल्ड
============================================
पीक संरक्षण साधनांची काळजी♥प्रगतशील शेतकरी♥
===================================
♥अ)कीटकनाशक वापरण्यापुर्वी काय काळजी घ्यावी
     =================================
1. भुकटी मारण्याचे साधन
     ===============
भुकटी मारण्यापुर्वी डबा अथवा पेटी मोकळी स्वच्छ आहे, याची खात्री करावी.
साधने थोडावेळ कार्यान्वित करावीत म्हणजे पुर्वी वापरलेल्या भुकटीचे कण निघून जातील.
भुकटीचे प्रमाण कमी जास्त करण्यासाठी असणारे यंत्र योग्य प्रमाणात ठेवावे.
भुकटी टाकताना तिचे गोळे झालेले नाहीत याची खात्री करावी.
साधनांचे सर्व भाग व्यवस्थित आहेत याची खात्री करावी. जर काही सांधे सैल झाले असतील तर नट अथवा स्क्रु आवळावेत.
साधनांच्या आवश्यक त्या सर्व भागात वंगण घालावे.
——————————————————————————–
2. द्रवरुप फवारण्याची साधनांची कशी व्यवस्था ठेवावी
     =================================
किटकनाशक मिश्रण तयार करण्याकरिता स्वच्छ पाणी वापरावे.
साधनांचे सर्व भाग व्यवस्थित आहेत याची खात्री करुन घ्यावी.
योग्य घटकांना वंगण घालावे.
किटकनाशक वापरण्यापुर्वी साधनात फक्त पाणी घालून फवारुन पहावे.
—————————————————————————————–
♥ब) किटकनाशक मारण्याचे काम झाल्यावर काय काळजी घ्यावी
     =========================================
साधन स्वच्छ करुन कोरड्या जागी ठेवावे.
साधनांची गाळणी / नोझल इत्यादी भाग स्वच्छ करुन घ्यावे.
अधूनमधून साधने चांगल्या अवस्थेत आहेत किंवा नाहीत याची चाचणी / खात्री करुन घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »