हरसुल येथे कृषीदूतांकडुन मार्गदर्शन

0

काजीसांगवीः-(उत्तम आवारे पत्रकार) चांदवड तालुक्यातील हरसुल येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत सेवा संस्कार संस्थेचे, श्रमशक्ती कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी कृषीदूत खैरे शुभम याने शेतकर्यांना मार्गदर्शन केले.

श्रमशक्ती कृषी महाविद्यालय,मालदाडचे विद्यार्थी कृषीदूत खैरे शुभम याने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव अभ्यास दौऱ्यास प्रारंभ केला.यादरम्यान त्याने गावातील शेतकऱ्यांसोबत शेतीविषयक विषयांवर शास्त्रीय माहिती देत संवाद साधला.अभ्यास दौऱ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीत माती आणि पाणी परिक्षण,एकात्मिक किड आणि रोग व्यवस्थापन,चारा प्रक्रिया,बिज प्रक्रिया, तसेच हवामान, बाजारभाव यांबद्दल माहिती देणारे विविध अ्प्सची माहिती देण्यात येणार आहे.

अशा प्रकारच्या उपक्रमांतून, पारंपारिक शेतीला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक जडणघडण होण्यास मदत होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.

या उपक्रमात त्यास ,श्रमिक उद्योग समुहाचे अध्यक्ष मा.साहेबरावजी नवले,प्रा.डॉक्टर.अशोक कडलग, प्रा.डॉ.अरविंद हारदे, प्रा.निलेश तायडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. जयेश धांगडा व विषयतज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »