अन्नद्रव्यांची कमतरता: पिकांवरील परिणाम व उपाय

अन्नद्रव्यांची योग्य मात्रा राखणे हे पिकांच्या वाढीसाठी आवश्यक आहे, कारण कोणत्याही घटकाची कमतरता किंवा अती प्रमाणामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला, काही महत्त्वाच्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून घेऊया:
💧🌾 नत्र (Nitrogen) – नत्राची कमतरता असताना झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची आणि झाडांची वाढ थांबते. परिणामी, फूट व फळे कमी येतात.
💧🌾 स्फुरद (Phosphorus) – पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, आणि पानांची मागची बाजू जांभळट दिसू लागते.
🌾💧 पालाश (Potassium) – पानांच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे आणि पिवळे ठिपके दिसतात. यामुळे खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
🌾💧 जस्त (Zinc) – पानांचे आकारमान कमी होते, शिरांमधील भाग पिवळा पडतो, आणि पिकांमध्ये पेरे लहान होतात.
💧🌾 लोह (Iron) – शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो, ज्यामुळे झाडांची वाढ खुंटते.
🌾💧 तांबे (Copper) – पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते, आणि पाने लगेच गळून पडतात. त्याशिवाय, पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.
💧🌾 बोरॉन (Boron) – टोकांवरील नवीन पालवीचा रंग फिक्कट होतो, आणि नवीन पाने मरण पावतात. पानांवर सुरकुत्या पडून पिवळे चट्टे दिसतात.
💧🌾 मॉलिब्डेनम (Molybdenum) – पाने फिक्कट हिरवी होऊन तपकिरी ठिपके दिसतात, आणि पानांच्या खालच्या बाजूस तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.
💧🌾 गंधक (Sulfur) – झाडांच्या पानांचा हिरवा रंग कमी होऊन पाने पूर्णपणे पिवळी-पांढरी होतात.
संतुलन साधणे आवश्यक:
सर्व अन्नद्रव्यांचे संतुलन साधणे महत्त्वाचे आहे कारण प्रत्येक घटकाची मात्रा अधिक झाली तर दुसऱ्या घटकांच्या प्रमाणात घट येऊ शकते. उदाहरणार्थ:
अशा प्रकारे, प्रत्येक घटकाचा एकमेकांशी संबंध असतो. या सर्वांचा संतुलन साधण्यासाठी पहिले पाण्याचा pH मेंटेन करणे गरजेचे आहे.