कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
चांदवड नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे वैभव विजय बागुल यांनी 6,925 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे चांदवड शहरात भाजपाचा प्रभाव अधिक मजबूत झाला आहे.
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत वैभव बागुल यांनी प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेत मतदारांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या विजयानंतर शहरात समर्थकांनी जल्लोष केला.
विजयी नगरसेवक / नगरसेविका – प्रभागनिहाय निकाल
विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक 01 अ
प्रियांका राऊत (भाजपा) – 601
प्रभाग क्रमांक 01 ब
सुधीर कबाडे (राष्ट्रवादी श.प.गट)-551
प्रभाग 02 अ
मंगल मोरे (अपक्ष)-781
प्रभाग 02 ब
राजू बागवान (अपक्ष)-720
प्रभाग 03 अ
प्रसाद (गोटू ) सोनवणे (अपक्ष)–635
प्रभाग 03 ब
नयना वाघ (अपक्ष)-453
प्रभाग 04 अ
पल्लवी मोरे (शिवसेना शिंदेसेना)-779
प्रभाग 04 ब
संदीप उगले (शिवसेना शिंदेसेना)-906
प्रभाग 05 अ
मनीषा भालेराव (भाजपा)-681
प्रभाग 05 ब
भूषण कासलीवाल (भाजपा)-879
प्रभाग 06 अ
जीवन देशमुख (भाजपा)-912
प्रभाग 06 ब
राजश्री प्रसाद प्रजापत (शिवशेना उबाठा)-493
प्रभाग 07 अ
कमल रामजी जाधव (भाजपा)-793
प्रभाग 07 ब
राहुल कोतवाल (भाजपा)-874
प्रभाग 08 अ
अनिता सुनील बडोदे (भाजपा)-732
प्रभाग 08 ब
महेंद्र गांधीमुथ्था (भाजपा)-537
प्रभाग 09 अ
प्रदीप बनकर (अपक्ष)-610
प्रभाग 09 ब
सरला अग्रवाल (भाजपा)-822
प्रभाग 10 अ
संभाजी गुंजाळ (भाजपा)-780
प्रभाग 10 ब
लीलाबाई कोतवाल (भाजपा)-695
फोटो – वैभव विजय बागुल थेटनगराध्यक्ष
️ राजकीय चित्र स्पष्ट
या निकालातून भाजपाने चांदवड नगर परिषदेत आपली ताकद दाखवून दिली आहे. काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनीही चांगली कामगिरी केली असून शिवसेनेचे (शिंदे गट व उबाठा) उमेदवारही निवडून आले आहेत.
चांदवड नगर परिषद नगराध्यक्ष – वैभव विजय बागुल ( भाजपा ) 6925 मते

