कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)
दिघवद वार्ताहर:-विद्यार्थी दशेपासून मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाची रुजवणूक व्हावी,त्यांच्यातील जिज्ञासेला वाव मिळावा ह्या उद्देशाने स्वामी विवेकानंद विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनाने वैज्ञानिक दृष्टिकोन, कुतूहल आणि सृजनशीलता वाढते,ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून विज्ञान शिकायला मिळते, समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित होतात, अंधश्रद्धा दूर होते आणि नवीन कल्पनांना चालना मिळते, जेणेकरून विद्यार्थी उद्याचे वैज्ञानिक आणि संशोधक बनू शकतील. ह्या उद्देशाने दिघवद विद्यालयात आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ यांनी केले. प्रदर्शनात इयत्ता 5वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून 50च्या वरती प्रयोग सादर केले. ह्यात प्रामुख्याने चांद्रयान मोहिमेचे प्रात्याक्षिक, कृत्रिम उपग्रह मॉडेल,सोलर कार, ज्वालामुखी उद्रेक,शाश्वत शेती, वनस्पतींपासून औषधे, घनकचरा व्यवस्थापन व वीजनिर्मिती,कम्युनिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटॅलाइट, हायड्रोलिक ब्रिज,समभार तत्व, जलसंवर्धन व विद्यूत निर्मिती असे अनेक नाविण्यपूर्ण प्रयोगाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती. या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक सुनील चंदनशिव, शशिकांत पाटील,अमोल ठोंबरे, सुनिता राठोड,कळूबाई साबळे, रीचिता गांगुर्डे,मधुकरगोसावी आदींचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक एस.डी.गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. पर्यवेक्षक के.पी.गांगुर्डे,अर्जुन गांगुर्डे,सुनील गांगुर्डे,संदीप पाटील,गणेश गांगुर्डे,शुभम हांडगे, सुधीर ठाकरे,रेणुका कानडे,रमा नगरारे,साहेबराव घोलप आदी उपस्थित होते.

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »