काजीसांगवी उत्तम आवारे | २४ डिसेंबर २०२५
जिल्हा परिषद आदर्श शाळा, काजीसांगवी (उत्तम आवारे) येथे केंद्रस्तरीय जि. प. अध्यक्ष चषक स्पर्धा २०२५/२६ उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध कला, बौद्धिक आणि क्रीडा प्रकारांत उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा नावलौकिक वाढविला.
वक्तृत्व, चित्रकला, स्पेलिंग बी, गणित, गीत-नृत्य तसेच धावण्याच्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले. अर्णव गणेश ठाकरे (वक्तृत्व), समीक्षा सोनवणे (चित्रकला), शंभूराज ठाकरे (Spelling Bee – इ. १ ली), वेदांत गवळे (Spelling Bee – इ. ४ थी), तसेच समूह गीत गायन व समूह नृत्य या स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली.
क्रीडा व इतर स्पर्धांमध्ये साई पवार (२०० मी. धावणे), कोमल चव्हाण (१०० मी. धावणे), ईश्वरी सोनवणे (Math Bee), प्रिया खैरनार (वैयक्तिक गीत), पूजा शिंदे (वैयक्तिक नृत्य) यांनी द्वितीय क्रमांक मिळविला, तर उन्मेश सोनवणे (Spelling Bee) यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल शाळा प्रशासन, शिक्षकवृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, भविष्यातही अशीच उज्वल कामगिरी करण्याच्या शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत.


विद्यार्थ्यांचे यश :
वक्तृत्व – अर्णव गणेश ठाकरे (प्रथम)
चित्रकला – समीक्षा सोनवणे (प्रथम)
Spelling Bee (इ. १ ली) – शंभूराज ठाकरे (प्रथम)
Spelling Bee (इ. ४ थी) – वेदांत गवळे (प्रथम)
समूह गीत गायन – (प्रथम)
समूह नृत्य – (प्रथम)
२०० मी. धावणे – साई पवार (द्वितीय)
१०० मी. धावणे – कोमल चव्हाण (द्वितीय)
Math Bee – ईश्वरी सोनवणे (द्वितीय)
वैयक्तिक गीत गायन – प्रिया खैरनार (द्वितीय)
वैयक्तिक नृत्य – पूजा शिंदे (द्वितीय)
Spelling Bee – उन्मेश सोनवणे (तृतीय)