अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कर्तबगार महिलांचा सत्कार

काजीसांगवी(उत्तम आवारे):  विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला काजी सांगवी येथील महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायत क्षेत्रातील महिला व बालविकास  क्षेत्रात काम करणाऱ्या दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करुन यथोचित सत्कार करण्याचे पाऊल उचललेले आहे.

                 त्या अनुषंगाने आपल्या ग्रामपंचायत क्षेत्रात कोरोना काळात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांचा ग्रामपंचायत काजीसांगवीच्या वतीने  आशा कार्यकर्ती सौ.शिला सुनिल ठाकरे यांचा सत्कार  सौ. सोनवणे वनिता विलास, ग्रामपंचायत सदस्य व अंगणवाडीसेविका सौ.संगिता माणिकराव सोनवणे यांचा सत्कार कु. ठाकरे सोनाली दौलत, ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी श्री. सुनील बाळकृष्ण ठाकरे, उपसरपंच, सौ.  वनिता विलास सोनवणे, कु. सोनाली दौलत ठाकरे, श्री. नरेंद्र रमेश ठाकरे, श्री. दत्तू नारायण आहेर, श्री. जनार्दन बाळासाहेब ठाकरे  हे  ग्रामपंचायत सदस्य तसेच सुरेश उत्तम ठाकरे, माणिकराव यशवंत सोनवणे, घमाजी सोनवणे, विलास अंबू सोनवणे. दौलत रघुनाथ ठाकरे, सोनाली राजेश सोनवणे, आदि ग्रामस्थ उपस्थित होते


 

पत्रकार -

Translate »