पपई वरिल इंटरनल ब्लाईट

0

पपई वरिल इंटरनल ब्लाईट

पपई वरिल इंटरनल ब्लाईट हा रोग क्लॅडोस्पोरीयम या बुरशीमुळे होतो. बुरशी देठाकडुन फळात शिरते. फळात शिरल्यानंतर हि बुरशी फळांतील बियांच्या आसपासच्या परिसरात वाढते, ज्यामुळे फळ आतुन खराब होते. संक्रमण झालेले फळ पक्व होत नाही.

रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.

कॉलर रॉट

रोगाची लागण झाली असता, रोप लहान राहते, पाने पिवळी पडतात.

मुळ तसेच खोड सडते. मुळांजवळील खोडावर लालसर रंगाचा पदार्थ दिसुन येतो.

रोगाच्या सुरवातीला खोडावर लक्षणे दिसुन येतात.

रोगाच्या नियंत्रणासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.


पपई वरिल फायटोप्थोरा ब्लाईट

पपईच्या रोपाच्या खोडावर हा रोग प्रामुख्याने दिसुन येतो. जमिनीलगत खोडावरिल भाग हलक्या रंगाच्या होतो, जसे संक्रमण वाढत जाते, तसे हि बुरशी संक्रमित भाग पुर्णपणे नष्ट करत जाते, ज्यामुळे त्या ठिकाणी खड्डा पडल्यासारखे किंवा हत्याराने इजा झाल्यासारखे भासते.

जमिनी लगतच्या खोडाच्या भागास इजा झाल्याने झाडास अन्नपुरवठा नियमित होत नाही, ज्यामुळे झाड मरुन जाते. फळ धारणा झालेले किंवा मोठे झाड कोलमडुन पडुन जाते. अशा झाडांना नविन सशक्त फुट देखिल येते, मात्र पावसाळ्याच्या वातावरणात मरुन जाते.

फळांवर देखिल हि बुरशी हल्ला करते. फळे आकुंचन पावतात, त्यांचा रंग गर्द तपकिरी हातो, अशी फळे तपकिरी काळी होतात.

बागेस पाणी देतांना, पाणी खोडास स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी.

रोगाच्या प्रतिबंधासाठी डायथेन एम ४५, झिनेब, मॅनेब, कॉपर हायड्रॉक्साईड, कॉपर ऑक्सिक्लोराईड ची फवारणी घ्यावी.

पपई वरिल भुरी

पपई वरिल भुरी हा रोग ओडीयम कॅरिके या बुरशी मुळे होतो.

बुरशी पानांच्या खालील बाजुस वाढत��

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »