पपई रिंग स्पॉट व्हायरस

पपई रिंग स्पॉट व्हायरस

पपई रिंग स्पॉट व्हायरस ग्रस्त रोपांच्या पानांच्या कडा वरिल बाजुस गोलसर वाकतात. पानांचा झुपका तयार होतो, तसेच पानांवरील शिरांच्या मधिल भागात पानांवर फुगवटे तयार होतात. लागण झालेली पाने वजनाने हलकी असतात. व्हायरस ची लागण झाल्यानंतर हवामानानुसार ९ ते ३९ दिवसांत लक्षणे दिसुन येतात. उन्हाळ्यात लागण झाल्यास ३ महिन्यांपर्यंत लक्षणे दिसुन येत नाहीत. हिवाळ्यात लागण झाल्यास ६ आठवड्यात लक्षणे दिसुन येतात.

लागण झालेल्या खोडांवर तेलकट ठिपके दिसुन येतात. खोडावरिल लक्षणे जमिनीपासुन अर्ध्या भागापासुन दिसुन येतात. फळांवरील लक्षणे जास्त स्पष्ट असतात, फळांवर पिवळे ठिपके आणि पिवळ्या रंगांची रिंग पडते, आतील भाग हिरवा राहतो. पपई रिंग स्पॉट व्हायरस ची लक्षणे हि जवळपास पपई मोझॅक व्हायरस सारखीच असतात, केवळ त्यांची तिव्रता कमी प्रमाणात असते.

पपई रिंग स्पॉट व्हायरस ची लागण मावा किडी मुळे होते. (एफिस गॉसिपी, एफिस मेडीकॅगनिस, एफिस रुमिनीस, एफिस पेरिसिके). मावा किड केवळ २ मिनीटात लागण झालेल्या पानांतुन व्हायरस ग्रहण करु शकते, त्यानंतर नविन पानांवरिल ५ मिनीटांच्या फिडिंग काळात ही किड नविन पानांवर लागण करु शकते. जर किडीने लागण झालेल्या पानांतुन व्हायरस ग्रहण केला तर त्यानंतर ती किड केवळ एकदाच त्या व्हायरस चे संक्रमण करु शकते, त्यानंतर तो व्हायरस किडीमध्ये राहत नाही.

मावा किडीमुळे रोगाचा प्रसार होवु नये म्हणुन, पपई लागवड केलेल्या शेताच्या चारी बाजुस एक किंवा दोन रांगा मका, ज्वारी, यासारखी पिके लावावीत. ज्यावेळेस मावा किड प्रथम मका किंवा ज्वारी पिकावर उपजिविका करेल त्यावेळेस, त्यातील व्हायरस सदरिल पिकांत संक्रमित होवुन जाईल, यानंतर जरी मावा किडीने पपईच्या पानांवर उपजीविका केली तरी पपई पिकावर व्हायरस संक्रमित होण्याचे प्रमाण कमी ह��
Source
Internet आधुनिक शेतकरी ग्रुप

पत्रकार -

Translate »