तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

2

तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

🍀 विविध पिकांसाठी शिफारस केलेली तणनाशकेच दिलेल्या मात्रेत अचूकपणे वापरावीत.
🍀 मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना याची काळजी घ्यावी.
🍀 तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा.
🍀 तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
🍀 तणनाशके ही नेहमी जोराचे वारे नसताना;तसेच फवारल्यानंतर दोन-तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस न येण्याची शक्यता पाहूनच फवारावीत.
🍀 फवारा जमिनीवर मारताना फवारा मारणाऱ्याने मागे मागे सरकत जावे जेणेकरून तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडत नाहीत.
🍀 ग्लायफोसेटसारखे बिनानिवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी 21 दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
🍀 तणनाशकांची फवारणी सर्वत्र समान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
🍀 उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारा त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी हूडचा वापर करावा.
🍀 तणनियंत्रणासाठी परिस्थितीनुसारच तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्याच्या वारंवार वापराचा अतिरेक टाळावा किंवा तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत/ कंपोस्ट खत/ गांडुळ खतांचा वापर करावा.

2 thoughts on “तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »