फळमाशीची ओळख –
पिवळसर सोनेरी असून, आकाराने घर-माशीपेक्षा मोठी असते. अळ्या पांढऱ्या रंगाच्या असतात. अंडी घातल्यानंतर त्यातून 3 ते 4 दिवसांत पांढऱ्या रंगाच्या अळ्या बाहेर येतात. अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फळाच्या गरावर उपजीविका करतात.

अशी फळे कुजतात. अळी अवस्था 11 ते 15 दिवसांची, तर कोष अवस्था 8 ते 11 दिवसांची असते. प्रौढ माशी 4 ते 5 महिने जगते. उपाययोजना-या किडीची अळी अवस्था ही फळाच्या आत असते. फवारणीद्वारा कीटकनाशक अळीपर्यंत पोचू शकत नाही. – तसेच नेमका फळ अवस्थेमध्ये किडीचा प्रादुर्भाव होतो. या किडीच्या नियंत्रणासाठी सापळे लावणे हा सोपा व पर्यावरणपूरक पर्याय होऊ शकतो. रक्षक सापळा – या सापळ्यामध्ये एक कुपी असून, त्यात मिथाईल युजेनॉलचा कापसाचा बोळा ठेवला जातो. मिथाईल युजेनॉलच्या गंधाने नर फळमाश्‍या खिडकीतून सापळ्यामध्ये येतात. आतमध्ये असलेल्या पाण्यात बुडून मरतात. 1.नौरोजी स्टोनहाउस सापळा – या सापळ्यामध्ये एक प्लायवूडचा ठोकळा ठेवला जातो. फळमाशीला आकर्षित करून मारण्यासाठी या ठोकळ्याला मिथाईल युजेनॉल/ क्‍युल्युर वापरल्या जातात.
2.फ्लॉय टी ट्रॅप – फळमाशीच्या नियंत्रणासाठी बाजारात काही खासगी कंपन्यांचे पिवळे गोल घुमटाकार सापळे उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »