खरीप पिकावरील खुरपडीचे करा नियंत्रण

0
खरीप पिकावरील खुरपडीचे करा नियंत्रण
खरीप पिकाच्या पेरणीनंतर रोपावस्थेमध्ये खुरपडीचा प्रादुर्भाव होतो. खुरपडी म्हणजे विविध प्राण्याचा एकत्रित प्रादुर्भाव. यामध्ये पक्षी, खार, वाणी, वाणी, नाकतोडे, क्रिकेट, वायरखर्म (काळी म्हैस) इत्यादीचा समावेश होतो. या किडी बहुभक्षी असून, एकदल, द्विदल, दाळवर्गीय, तेलवर्गीय पिकांवर या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. 
– विशेषतः कमी ओलाव्यात बियाणे व्यवस्थित खोलीत न पडल्यास किंवा बियाणे व्यवस्थित झाकले न गेल्यास पक्षी दाणे वेचून खातात. 


– खार दाणे उकरून खाते.
– पावसाळ्यात सुरवातीला वाणीचे ‘समुद्र’ शेतात दिसतात. वाणी रोपट्यांच्या बुंध्याशी डोके खुपसून आत शिल्लक असलेला दाणा खातात. कालांतराने अशी रोपे सुकतात. वाणी ही कीड ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते.
– जमिनीवरील नाकतोडे रंगाने काळे असून, ते कमी अंतराच्या उड्या मारतात. ते जमिनीतील दाणे खाऊन नुकसान करतात.
– वायरवर्म (काळी म्हैस) ही कीड कोली ओप्टेरा वर्गातील असून, हिच्या अनेक प्रजाती आहेत. या किडीचे प्रौढ भुरकट ते काळ्या रंगाचे असतात. ही किडीच्या अळ्या (वायरवर्म) अंकुरलेली दाणे खातात, तर प्रौढ रोपट्यांचा बुंधा जमिनीलगत कुरतडतात. यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.

– मे व जून महिन्यांत पाऊस हलका व तुरळक तसेच २०० ते २५० मि.मि. पेक्षा कमी पडल्यास जमिनीतील किडीच्या (वायरवर्म/ वाणी) जीवन चक्रास चालना मिळते. त्यांचे प्रजोत्पादन झपाट्याने होते. परंतु, दोन ते तीन वेळा (भारी वारंवारितेचा) पाऊस झाल्यास या किडी जमिनीत दबून नष्ट होतात. प्रादुर्भावात लक्षणीय घट होते.
– पडीत गवताळ जमिनी किडीच्या प्रजोत्पादनासाठी उपयुक्त असतात.
– भुसभुशीत व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन काळी म्हैस या किडीच्या वाढीस अत्यंत उपयुक्त असते.
वायरवर्म (काळी म्हशी) साठी सर्वेक्षण –
पेरणीपूर्वी शेतातील एकरी वीस ठिकाणी अस्ताव्यस्तपणे सर्वेक्षण करावे. त्यासाठी निवडलेल्या जागेवर १ फूट x १ फूट x ०.५० फूट याप्रमाणे खड्डा करून माती गोळा करावी. त्यातील किडीच्या अळ्या व प्रौढ यांची संख्या मोजावी. त्याची सरासरी काढावी.
– किंवा गव्हाचे पीठ दीड कप + मध दोन चमच + पाणी अर्धा कप या मिश्रणाच्या गोळ्या तयार करून कांदे साठवण्याच्या पोत्याच्या छोट्या तुकड्यामध्ये बांधून आमिष तयार करावे. या गोळ्या १० ठिकाणी झेंडे लावून ४ ते ६ इंच खोल गाडाव्यात. ४ ते ५ दिवसांनी सर्वेक्षण करावे. या ठिकाणी आढळलेल्या किडींच्या संख्येवरून प्रादुर्भावाचा अंदाज मिळण्यास मदत होते. 
१. पक्षी व खारी पासून पीक वाचवण्यासाठी शेताची राखण करावी.
२. वाणीचे समूह गोळा करून नष्ट करावे.
३. सेंद्रीस प्रदार्थ/ पिकांचे अवशेष/ किडीचे हंगामापूर्वी विल्हेवाट लावावी. तसेच न कुजलेल्या सेंद्रिय खताचा वापर शेतीमध्ये करू नये. यात वाणी, वायरवर्म यांसारख्या किडींचे प्रजोत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
४. नाकतोड्याच्या नियंत्रणासाठी धुऱ्यावरील गवताचा वेळोवेळी नायनाट करून, धुरे स्वच्छ ठेवावे.
Source:
डॉ. ए.व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४
(किटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला) 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »