सुपर फॉस्फेट पीकवाढीस उपयुक्त

0
सुपर फॉस्फेट पीकवाढीस उपयुक्त
सुपर फॉस्फेट हे उच्च दर्जाचे फॉस्फेट रॉक तसेच सल्फ्युरिक आम्ल वापरून बनविले जाते. फॉस्फेट रॉकमध्ये जे फॉस्फेट उपलब्ध असते, ते पाण्यात विद्राव्य स्वरूपात नसते. सल्फ्युरिक आम्लाची प्रक्रिया केल्यानंतर त्याचे रूपांतर पाण्यात विद्राव्य स्वरूपात होते. १६ टक्के नैसर्गिक अमोनिकल सायट्रेट विद्राव्य फॉस्फेटमध्ये १४.५ टक्के फॉस्फेट हे पाण्यात विद्राव्य स्वरूपात उपलब्ध असते, तसेच किमान ११ टक्के गंधक व साधारण १९ टक्के कॅल्शिअमची मात्रा त्यामध्ये रासायनिक प्रक्रियेद्वारे उपलब्ध होते. गंधक हे सल्फ्युरिक ॲसिडच्या वापरामुळे व कॅल्शिअम हे फॉस्फेट रॉकमधून उपलब्ध होते. 


सुपर फॉस्फेट हे संयुक्त खतासारखा फॉस्फेटचा एक पर्याय आहे. जमीन व पिकाच्या आवश्यकतेनुसार नत्र व पालाशसोबत वापरून आवश्यक ग्रेड्‍स बनविता येतात. त्यामुळे अनावश्यक मूलद्रव्ये वापरल्यामुळे होणाऱ्या खर्चाची बचत होते. आवश्यक मूलद्रव्य जमीने, पिकास मिळाल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीचा पोत कायम राहण्यास मदत होते. डीएपी खतामध्ये उपलब्ध असलेल्या फॉस्फेट या मूलद्रव्याच्या तुलनेत सुपर फॉस्फेटमध्ये उपलब्ध असलेल्या फॉस्फेटसोबत इतर मूलद्रव्ये म्हणजेच गंधक व कॅल्शिअम उपलब्ध असतात. डीएपीमधील फॉस्फेटऐवजी सुपर फॉस्फेट वापरले तर ते पिकास उपयुक्त ठरते.
केंद्र शासनाच्या अन्य धोरणानुसार डीएपी या खताचा वापर सुपर फॉस्फेट या खतात परावर्तित करण्यासाठी (कमीत कमी पाच टक्के) सुचविले असून, त्यामुळे खतांच्या आयातीवर निर्बंध होऊन परकीय चलन वाचविण्यास मदत होईल, तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील कृत्रिम टंचाई, तसेच भावातील चढ-उतारांचा आर्थिक फटका बसणार नाही. आयातीत खतांवर अवलंबून राहणे टळू शकेल. सन २०१० पासून केंद्र शासनाने सुपर फॉस्फेटचा वापर वाढवावा म्हणून याचा समावेश एनबीएसमध्ये केला आहे, अशी माहिती कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे उपसरव्यवस्थापक (विक्री) अरुण वाळुंज यांनी दिली आहे.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »