खताचे नियोजन

0

खताचे नियोजन

बेसल डोस देण्या पुर्वी कोणत्याही परीस्थितीत सेंद्रिय खते सरी मध्ये टाकावे . सेंद्रिय खत म्हणजे शेण खत, कंपोस्ट खत, गांडुळ खत, पेंडी मिश्रण खत लेंडी खत वगैरे योग्य प्रमाणात सरीत टाकावे.
त्या वर खालील प्रमाणे बेसल डोस टाकावा आणि खेकड्याने किंवा छोट्या खुरट चालवुन  दोन्ही खते सरीतल्या मातीत मिसळुन घ्यावे .
A  बेसल डोस
1 युरीया               25 किलो
   सि सु फॉस्फेट   300 किलो
@@ किंवा *** या दोन्ही साठी पर्याय
   डिएपी               100 किलो

2 पोटॅश                  75 किलो
3 सुक्षम अन्न द्रव्ये   15 किलो (ग्रेड ll)
4 बेनसेल्फ गंधक     15 किलो
5 मॅग सल्फेट           25 किलो
6 ह्युमिक आसिड        5 किलो
     ही सर्व खते सरीत टाकुन मातीत मिसळुन घ्यावित . नुसते सरीत टाकुन लगेच लागण करु नयेत .
@@ जर रोपाची लागण करावयाची असल्यास वरील खते आगोदर सरीत टाकुन मातीत मिसळुन घेउनच नंतर खड्डे काढुन त्यात शक्य झालेस थोडे पाणि घालुन लागण करावी .

🔴⚗ऊस व रोप लागणि नंतर  8/10 दिवसात जिवाणु ड्रिपने किंवा आळवणिने किंवा सायंकाळी ओल्या सरीत टाकावेत .
1 आझोटोबॅक्टर   2 लिटर किंवा 2 किलो
2 पी एस बी        2 लिटर किंवा 2 किलो
3 ट्रायको             2 लिटर किंवा 2 किलो

🔷B दुसरा डोस *  लागणी पासुन 20 व्या दिवशी
1 युरीया           50 किलो  सरीत टाकावे
   ज्यांच्या कडे ठिबक आहे त्यान्नी
    युरीया रोज 2 किलो प्रमाणे 25 दिवस द्यावे .
  @ ज्यानी रोप लावली आहेत त्यानी 4/5 दिवसानी
       युरीया        75 किलो द्यावा
     किंवा ठिबकणे दररोज 3  किलो प्रमाणे 25 दिवस द्यावे .

🔴🔴नविन लागणी साठी फवारणीचे नियोजन
@@@फवारणी @@@
लागणि पासुन 40 व्या  दिवशी किंवा रोप लावणी पासुन 10 व्या दिवशी  फवारणी घ्यावी .
# 15 लिटरचे 4 पंप पुरतात . (60 लिटर पाणी)
1 संजीवक  IBA   1 ग्रॅम alkohol मध्ये मिसळावे
2 संजीवक   6BA 4 ग्रॅम Solvant मध्ये मिसळावे
   8लिटर पाण्यात वरील दोन्ही मिश्रण मिसळावे व प्रत्येक पंपास 2 लिटर घ्या.
3 19:19;19            400 ग्रॅम – प्रत्येक पंपास 100 ग्रॅम
4 चिलेटेड सु अ द्रव्ये   80 ग्रॅम  – प्रत्येक पंपास  20 ग्रॅम
5 क्लोरो                 120 मिली- प्रत्येक पंपास  30 मिली
6 बाविस्टीन           120 ग्रॅम   – प्रत्येक पंपास  30  ग्रॅम
💥 वरील प्रमाणे फवारणी घ्यावी ..
या मुळे फुटवे एकसारखे येतीलच आणि खोड किडीला आळा बसेल . वाढ अत्यंत जोमाने होते .
Source:
♻कृषिभुषण संजीव माने आष्टा 
♻अजिंक्य माने आष्टा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »