कृषी न्यूज(काजीसांगवीःउत्तम आवारे ) होळकर घराण्याचे वंशज भूषण सिंह राजे होळकर यांनी चांदवड होळकर नगरीला भेट देऊन चांदवड रंगमाहलाच्या कामाची पाहणी केली चांदवड रंगमहलाची पूर्णपणे बारीक पणे लक्ष देऊन काम करण्यासंदर्भात त्यांनी सूचना केल्या त्याचप्रमाणे कामासंदर्भात होत असणारी दिरंगाई तसेच कामामध्ये होत असणाऱ्या चुका यासंदर्भात तेथील व्यवस्थापकांना मार्गदर्शन केले . होळकर वाड्यातील ऐतिहासिक महत्त्व तसेच होळकर वाड्यातील नक्षीकाम तेथील कारागिरी चे महत्व होळकर वाड्याची रचना व्यवस्थापन या संदर्भात महाराजांनी उपस्थितांना आमुलाग्र माहिती दिली महाराजांनी यानंतर चांदवडची रेणुका देवी मंदिर या ठिकाणी जाऊन रेणुका मातेचे दर्शन घेतले व मंदिराच्या गाभाऱ्यात बसून मंदिराची पाहणी केली त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील पहिले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृति मंदिर चांदवड येथील तलावाशेजारी उभारण्यात आले असून त्या स्मृति मंदिरात भेट देऊन महाराजांनी स्वहस्ते मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन केले. चांदवड व परिसरामध्ये होळकरांचे विशेष प्रेम असल्याबाबत वक्तव्य केले त्याचप्रमाणे ऐतिहासिक वास्तू ह्या जपल्या जायला हव्यात ह्या वास्तू फक्त ऐतिहासिकच नाही तर आमच्यासाठी घराण्याच्या माणसन्मान वाढवणाऱ्या वास्तू आहेत आणि त्यांचे व्यवस्थापन हे चांगल्या प्रतीने व्हायला हवं यासाठी प्रयत्न व्हायला हवे व ह्या वास्तु पुरातत्त्व विभागाने लवकरात लवकर यांचे काम पूर्ण करून या सार्वजनिक पर्यटनासाठी खुल्या करण्यात याव्या यासाठी प्रयत्न करायला हवे असेही भूषण सिंह राजे होळकर यांनी सांगितले
याप्रसंगी हिंदू धर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समितीचे अध्यक्ष समाधान बागल मल्हार महासंघ सरचिटणीस मच्छिंद्र बिडकर, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती विक्रम बाबा मार्कंड, दत्तात्रय बारगळ, अमोल दीक्षित, व्यवहारे, जालिंदर मोरे, योगेश पानसरे, व ग्रामस्थ उपस्थित होते..

पत्रकार -

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »