राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे.
राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मध्य बांगलादेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम असून, ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याचे संकेत आहे.
कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मुंबई, नंदुरबार,जळगाव, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली.ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.