PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ आता बायकोलाही मिळणार? जाणून घ्या नियम

0

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा लाभ आता बायकोलाही मिळणार? जाणून घ्या नियम

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात सहा हजार रुपये जमा केले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होतात. याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित किरकोळ खर्च काढण्यासाठी होतो . भारत सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ थेट शेतकरी कुटुंबांना होतो. जर कुटुंबातील पती पत्नी दोघेही शेतकरी असेल तर या योजनेचा लाभ दोघांना घेता येतो का? असा अनेकांना प्रश्न पडला आहे. मात्र या योजनेचा फायदा कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबासाठी चालवली जाते. पती-पत्नी दोघेही शेतकरी असले तरी कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. पीएम किसान पोर्टलवरील नियमावलीमध्ये याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. या योजनेमध्ये शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती नोंदणी करू शकते. यासाठी एकापेक्षा जास्त व्यक्तींनी नोंदणी केल्यास ती रद्द केली जाते. दुसरीकडे, या योजनेचा लाभ दोन्ही लोकांना मिळत असेल, तर सरकार ते केव्हाही रिकव्हर करू शकते. गेल्या वर्षभरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही प्रकरणे बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहेत. एकाच कुटुंबातील दोन सदस्य सन्मान निधीचे हप्ते घेत असतील, तर सरकार नोटीस पाठवते आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येते.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »