पन्हाळे ग्रामपंचायत व शाळेत स्वतंत्र अमृत महोत्सव उत्साहात साजरा


काजीसांगवीः (उत्तम आवारे ): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळे येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजाचे ध्वजारोहण अमोल छबु आवारे सुजित मोठ्याभाऊ कुंभार्डे रोशन विश्वनाथ आवारे इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेल्या जवानांनी ध्वजाचे ध्वजारोहण केले व स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या समारोह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमात राष्ट्रगीत ,ध्वजगीत , राज्य गीत , निपुण प्रतिज्ञा ,कवायत प्रात्यक्षिक ,वैविध्यपूर्ण लेझीम प्रात्यक्षिक या उपक्रमांचा सहभाग होता .यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे मराठी आणि इंग्रजी भाषणे विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात सादर केली .यावेळी शाळेस लोकवर्गणीतून मिळालेल्या दोन व्हाईट बोर्डाचे अनावरण करण्यात आले .शाळेत सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली .यावेळी गावातील सर्व महत्त्वपूर्ण पदाधिकारी , सरपंच , उपसरपंच , पोलिस पाटील , ग्रा प सदस्य , तंटामुक्ती अध्यक्ष, वि का सो चेअरमन व सर्व सदस्य ‘ , व्यवस्थापण समिती अध्यक्ष ‘ उपाध्यक्ष व सर्व सदस्य , ग्रामस्थ ,पालक ,शिक्षक ,इतर सरकारी कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते . व गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोरील ध्वजाचे ध्वजारोहण जवानांच्या हस्ते करण्यात आले व शिलालेखाचे अनावरण जवानांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच सदस्य गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते
Everything is very open with a really clear description of the issues. It was definitely informative. Your site is useful. Thank you for sharing!