Silk Cocoon Market : जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (ॲप) विकसित

0

Silk Cocoon Market : जालन्यात रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (ॲप) विकसित

Jalna Silk Market : जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली(ॲप) लॉंच केली आहे.
Silk Cocoon Market : जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाने १ एप्रिलपासून रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली(ॲप) लॉंच केली आहे. या विकसित प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर बाजारपेठेतील रोजचे रेशीम कोषांचे दर, प्रातिनिधीक रूपात कवच टक्केवारी, एकूण कोषांची गाव, तालुका, जिल्हा निहाय आवक, रेशीम उद्योगाविषयी तांत्रिक माहिती, रेशीम सल्ला, हवामान अंदाज माहिती दररोज पहावयास मिळण्याची सोय होते आहे.
सद्यःस्थितीत जालन्याच्या रेशीम कोष बाजारपेठेत कोषांची खरेदी-विक्री नजर अंदाज व व्यापाऱ्यांच्या अनुभवानुसार खुला दर पुकारण्यात येतो. सदरचा दर शेतकऱ्यास मान्य झाल्यास खरेदी-विक्री प्रक्रिया पूर्ण होत होती.
मराठवाडा रेशीम उद्योगाचा हब मानला जातो. बाजारपेठेसह धागा निर्मितीत पाय रोवणाऱ्या मराठवाड्यातील रेशीम उद्योगाची वाटचाल आता अंडीपुंज निर्मिती व जालना येथे अद्ययावत अशा रेशीम कोष बाजारपेठेच्या कार्यान्वीततेच्या दिशेने सुरू आहे.
जालना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या संकल्पनेतून व जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय मोहीते यांचे प्रयत्नाने एका खासगी कंपनीद्‌वारे रेशीम कोष बाजारपेठ व्यवस्थापन प्रणाली (सॉफ्टवेअर ॲण्ड एएमपी मोबाईल ॲप) ची निर्मिती केली आहे.
जालना जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आतापर्यंत जवळपास १८१७ शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरू केला आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असल्याने ॲप डाऊनलोड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.
विकसित प्रणालीचा शेतकऱ्यांनी व रेशीम कोष बाजारपेठेशी संबंधितांनी प्रत्यक्ष वापर १ एप्रिल २०२३ पासून सुरू केला आहे. प्रत्येक रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्याला आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन सिल्क ककून मार्केट जालना( Silk Cocoon Market Jalna) असे टाइप करून ॲप इन्स्टॉल्ड करून घेता येईल.
१०३ टन कोष खरेदी
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत १ एप्रिलपासून म्हणजे ॲप कार्यान्वित झाल्यापासून ७ मे पर्यंत १०३ टन कोषाची विक्री झाली. विविध जिल्ह्यातून आलेल्या जवळपास १०७१ शेतकऱ्यांचे हे कोष होते.
दरदिवशी किमान ४ टन कोष जालना बाजार समितीमध्ये येत आहेत. सरासरी ४८ लॉटमधून आलेल्या कोषांची विक्री होते आहे. या कोषांना २०० त ५२५ रुपये प्रतिकिलोपर्यंत दर मिळाल्याची माहिती रेशीम कोष खरेदी विक्रीची रेशीम विभागातर्फे जबाबदारी सांभाळणारे भरत जायभाये यांनी दिली.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »