लम्पीचीही ‘दुसरी लाट’, पशुपालकांमध्ये चिंता; लसीकरण करून घेण्याचे आवाहन
लम्पीचीही ‘दुसरी लाट’, पशुपालकांमध्ये चिंता; लसीकरण करून घेण्याचे आवाहन.
Lumpy Skin Disease Update : गेल्यावर्षी राज्यभरात जनावरांमध्ये लम्पीचा (Lumpy) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाले. त्यानंतर सरकराने लसीकरण (Vaccination) राबवत लम्पी नियंत्रणात आल्याचा दावा केला होता. मात्र आता पुन्हा एकदा लम्पीची दुसरी लाट पाहायला मिळत आहे. कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा भागात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 13 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
आठ महिन्यापूर्वी लम्पी आजारामुळे जनावरांना अक्षरशः मृत्यूचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सरकराने देखील गंभीर दखल घेत उपाययोजना केल्या. गावागावात लसीकरण करण्यात आले. मात्र आता पुन्हा एकदा अशीच काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर जिल्ह्यातील साकोळ आणि राणी अंकुलगा या गावात जनावरांमध्ये लम्पीचं प्रादुर्भाव दिसून येत आहे. तर साकोळ पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अंतर्गत 13 पशूंचा मृत्यू झालेला असून, 16 गंभीर आजारी आहेत. त्यामुळे पशुवैद्यकीय विभागाची चिंता वाढली आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पथकाने या गावात भेटी देखील दिल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात येतांना दिसत नाही. विशेष म्हणजे या भागातील पशू हे औषध उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणे आहेत.
धन्यवाद
🙏🙏🙏