Agricultural Commodity Market : शेतीमाल बाजाराची दिशा काय राहू शकते?

0

Agricultural Commodity Market : शेतीमाल बाजाराची दिशा काय राहू शकते?

Market Update : देशातील कमोडिटी बाजारात मागील दोन ते तीन महिन्यांपासून काहीशी अनिश्चितता दिसत आहे. सोयाबीन आणि कापसाचा हंगाम सुरु होऊन सात महिने झाले. शेतकऱ्यांनी यंदा कापूस आणि सोयाबीनचा स्टॉक मागे ठेवला होता. यंदा तरी चांगला भाव पदरात पडेल अशी आशा होती.
Commodity Market Update : देशातील कमोडिटी बाजारात (Commodity Market) मागील दोन ते तीन महिन्यांपासून काहीशी अनिश्चितता दिसत आहे. सोयाबीन आणि कापसाचा हंगाम (Soybean Market) सुरु होऊन सात महिने झाले. शेतकऱ्यांनी यंदा कापूस आणि सोयाबीनचा स्टॉक (Soybean Stock) मागे ठेवला होता. यंदा तरी चांगला भाव पदरात पडेल अशी आशा होती.
पण मे महिन्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांकडे सोयाबीन आणि कापसाचा काही प्रमाणात स्टॉक आहे. तर पहिल्यांदाच मे महिन्यात दोन्ही कमोडिटीजचे दर दबावात आहेत. दुसरीकडे उत्पादन घटल्याने तुरीला चांगला दर आहे. उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत घट आणि सरकारच्या चांगल्या खरेदीनंतरही सरकारच्या दबावामुळे हरभरा सध्या दबावात आहे. त्यामुळे शेतीमाल बाजारात पुढील काळात काय परिस्थिती राहू शकते, याचा अंदाज घेणे गरजेचे आहे.
कापूस बाजारावर कशाचा दबाव ?
देशातील कापूस उत्पादनात यंदा मोठी घट झाली. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने यंदा देशातील कापूस उत्पादन २९८ लाख गाठींवर स्थिरावेल, अशा अंदाज जाहीर केला. मागील हंगामातील कापूस उत्पादन ३०७ लाख गाठींवर स्थिरावले होते.
एप्रिल महिन्यातील अंदाजात देशातील उत्पादन ३०३ लाख गाठींपर्यंत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. तर मे महिन्यातील अहवालात उत्पादनात पुन्हा ५ लाख गाठींची कपात करण्यात आली. कापूस उत्पादनात घट झाल्याचे शेतकरी सातत्याने सांगत आले.
पण उद्योगांनी हंगामाच्या सुरवातीपासूनच विक्रमी उत्पादनाची री ओढली होती. पण आवकेचा हंगाम जसजसा पुढे गेला तसतसे उत्पादनातील घट स्पष्ट होत गेली.
उद्योग, व्यापारी, जिनिंग, सूतगिरण्या तसेच आयातदार आणि निर्यातदारांची संघटना असलेल्या कॉटन असोसिएशन ऑफ इंडियातर्फे( सीएआय) यंदा उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »