कृषी बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान,अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित
कृषी बाजार समिती बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान,अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित
राज्यात कृषी संदर्भात रोज नव्या घडामोडी घडत असतात. शेतकऱ्यांच्या समस्या अशा आहेत की, कधीचं संपत नाही. सध्या उन्हाच्या तडाख्यामुळं पीक करपली आहेत.
धुळे : धुळे (dhule) कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने शेतकऱ्यांना (farmer) मोठं नुकसान सोसावं लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे, तर दुसरीकडे मात्र उरला सुरलेला कांदा शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत आहेत. मात्र सातत्याने कांद्याची आवक जास्त झाल्याचे कारण सांगत कांदा खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) कांद्याची खरेदी सुरू आहे. असा असताना कृषी उत्पन्न बाजार समिती बंद असल्याने येणारा शेतकरी कांदा घेऊन येऊ लागला आहे. मात्र त्याला माघारी फिरावे लागत आहे. एकीकडे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे नुकसान झालेलं असताना दुसरीकडे कांद्याला भाव नाही. तिसरीकडे कांदा खरेदीत होत नसल्याने अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जायचे कुठे ? असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभा टाकला आहे.
अतिवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी अजूनही वंचित
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत करमाळा तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील कांदा, उडीद, मका, फळबागांचे नुकसान झाले होते. पंचनामा यादीत नाव असूनही अनेक शेतकऱ्यांचे अतिवृष्टीचे अनुदान मिळाले नाही. शासकीय कार्यालयात याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.
खाजगी डेअरी मालकांनी दुधाचे दर पाडले
सोलापूर जिल्ह्यातील दूध खरेदी करणाऱ्या काही खाजगी डेअरी मालकांनी दुधाचे दर पाडले. या निषेधार्थ रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून रस्त्यावर शेतकऱ्यांनी दूध ओतून आंदोलन केले आहे. तसेच पंढरपूर विजयपूर रस्त्यावर रास्ता रोको देखिल करण्यात आला. सध्या शेतकरी सगळीकडून अडचणीत आला असताना खाजगी आणि सहकारी दूध उत्पादक संघाचे चेअरमन यांनी एकत्र येऊन लिटर मागे तीन रुपये कमी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रयत क्रांती संघटनेचे नेते दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दूध ओतून एकलासपूर येथे आंदोलन करत दूध संघाचा निषेध केला.
धन्यवाद
🙏🙏🙏