श्रीराम विद्यालय रायपुर येथे शिक्षकदिन उत्साहात संपन्न

0


काजीसांगवीः (उत्तम आवारे) ५ सप्टेंबर : श्रीराम विद्यालय रायपुर येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षकदिन या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर.के. सर होते .तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यालयातील उपशिक्षक श्री. पाटील सर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहूणे यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आज विद्यालयातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून दिवसभर अध्यापनाचे काम केले. विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार विद्यार्थी शिक्षकांच्या हस्ते करण्यात आला.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी शिक्षक यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षक मनोगतामध्ये विद्यालयातील श्री. पाटील एस.जी. सर व उपशिक्षीका श्रीम. निकम मॅडम यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याविषयी सखोल अशी माहिती सांगीतली. शेवटी अध्यक्षीय भाषण झाले. अध्यक्षीय भाषणात सरांनी डॉ. राधाकृष्णान यांच्याविषयी सखोल अशी माहिती सांगितली.कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. गांगुर्डे आर.के. सर, सर्व शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. गागरे सर व श्रीम. निकम मॅडम यांनी केले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »