Monsoon 2023 : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार? पावसाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार

0

Monsoon 2023 : अल निनोच्या संकटामुळे यंदा पाऊस कसा असणार? पावसाचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार

मुंबई : सलग चार वर्षे चांगला मान्सून (Mansoon) दिल्यानंतर ‘ला-नीना’ (la nino) निरोप घेत यंदा अल निनोचा प्रभाव असणार आहे. यामुळे भारतातील मान्सूनला आता अल निनोचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. अल निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. यंदा मे ते जुलैदरम्यान ‘अल-नीनो’ची स्थिती राहू शकते. तसेच जून ते ऑगस्ट दरम्यान अल निनो सक्रिय असू शकते, अशी शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली आहेच. देशात यापूर्वी 2018 मध्ये अल नीनो (El Nino) चा प्रभाव दिसला होता. त्यानंतर 2019, 2020, 2021 आणि 2022 अशी सलग चार वर्षे चांगला पाऊस झाला.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) नवीन अंदाजात म्हटले आहे की, यंदा मान्सूनमध्ये अल निनोचा प्रभाव होण्याची शक्यता 70 टक्के आहे. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. 11 एप्रिल रोजी IMD ने अल निनोची शक्यता व्यक्त केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त पावले उचलण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. आता हवामान विभागाच्या दुसऱ्या अंदाजानुसार, जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अल निनोची शक्यता 70 टक्के आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यात ही शक्यता 80 टक्क्यांपर्यंत असणार असल्याचे शुक्रवारी सांगितले.
पगार वाढणार, कोण ठरणार पात्र
Image
पुणे डीआरडीओ संचालकाने पाकिस्तानाला पुरवली गुप्त माहिती, एटीएसला तपासात काय काय मिळाले?
Image
pune fire : मोठा अनर्थ टळला, अन्यथा ४०० सिलेंडरच्या स्फोटाने पुणे हादरले असते
Image
पुणेकरानों आपलेच फक्त एक काम करा, अन् जिंका टू बीएचके घर, चारचाकी, दुचाकी, स्मार्ट फोन
केंद्रीय पातळीवर बैठका
देशात अल निनोचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि आयएमडीकडून योजना तयार केली जात आहे. त्यासाठी मासिक बैठकाही होत आहेत. यंदा IMD भारतातील 700 जिल्ह्यांना कृषी-हवामानविषयक सल्लागार सेवा आणि अंदाज देणार आहे. कृषी विज्ञान केंद्रांमार्फत त्याचा प्रसार केला जाणार आहे.
किती वेळा अल निनोचा प्रभाव
2001 ते 2020 या कालावधीत भारताने सात वेळा अल निनोचा प्रभाव पाहिला आहे. अल निनोमुळे 2003, 2005, 2009-10, 2015-16 यामध्ये अनुक्रमे 16 टक्के, 8 टक्के, 10 टक्के आणि 3 टक्के खरीप किंवा रब्बीच्या उत्पादनात घट झाली होती. त्यामुळे महागाई वाढली. खरीप पिकांचा देशाच्या वार्षिक अन्न पुरवठ्यापैकी निम्मा वाटा आहे.
महागाईवर काय परिणाम
केरळमधील कोट्टायम केंद्राचे संचालक डी शिवानंद पै म्हणाले की, हिंदी महासागरातील दोन ठिकाणांमधला (पश्चिम आणि पूर्व) तापमानाचा फरक आहे. 2009 मध्ये, जेव्हा देशाला तीन दशकांतील सर्वात भीषण दुष्काळाचा फटका बसला होता, तेव्हा देशाने 2007 च्या तुलनेत दशलक्ष टन अधिक अन्नधान्य उत्पादन केले. त्यामुळे दुष्काळ पूर्वीसारखे संकट राहिले नाही. परंतु दुष्काळामुळे महागाई वाढते, शेतीचे उत्पन्न कमी करतो आणि अर्थव्यवस्थेला फटका बसतो.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »