अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान

0

अमरावती: अवकाळी पावसाने ८ हजार हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान

शेतकरी नुकसान भरपाईच्‍या प्रतीक्षेत आहेत.
अमरावती: जिल्‍ह्यात एप्रिल महिन्‍यात ३ हजार २०० हेक्‍टरमधील पिकांचे नुकसान झालेले असताना मे मध्‍ये अवघ्‍या तीन दिवसांतील वादळी पावसाने तब्‍बल ४ हजार ९७१ हेक्‍टरमधील पिकांची हानी झाली आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईच्‍या प्रतीक्षेत आहेत.
मार्च महिन्‍यापासून जिल्‍ह्यात बारा वेळा अवकाळी पावसाने हादरा दिला. यात रब्‍बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्‍ह्यात २ मे रोजी झालेल्‍या अवकाळी पावसाने मोर्शी, भातकुली, दर्यापूर आणि अचलपूर तालुक्‍यांत ४ हजार २८३ हेक्‍टरमध्‍ये, ३ मे रोजी पुन्‍हा अचलपूर तालुक्‍यात २११ हेक्‍टर तर ४ मे रोजी मोर्शी तालुक्‍यात २१० आणि अचलपूर तालुक्‍यात २६५ हेक्‍टरमधील गहू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्‍याचा जिल्‍हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्‍याचे आदेश जिल्‍हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
गेल्‍या एप्रिल महिन्यातील ९ दिवसांत‎ जिल्ह्यात साधारण ६७ मिमी. पावसाची नोंद‎ झाली. या पावसामुळे तब्बल ३२०० हेक्टर‎ शेतजमिनीवरील पिके नष्ट झाली असून, १३‎ गोठ्यांसह २,१०५ इमारतींची पडझड झाली.‎ यापैकी २५ एप्रिलपर्यंतच्या नुकसानासाठी‎ जिल्हा प्रशासनाने २ कोटी ४९ लाख ८ हजार‎ ६६० रुपयांच्या अनुदानाची मागणी केली‎ आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »