Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र

0

Farm Mechanization : ऊस पिकासाठी बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र

बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र मातीत खते देणे, बियाणे पेरणीसाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने मुळांचा जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची छाटणी करण्यासही फायदेशीर ठरणारे आहे.
खोडवा पिकामध्ये संवर्धित शेतीमध्ये पाचट आच्छादन (Trash Mulching) केले जाते. परंतू अजूनही शेतकरी पाचट जाळतात. यामुळे मातीचे जीवशास्त्र विस्कळीत होते, नैसर्गिक भू-चक्र बिघडते, सुपीकता कमी होते आणि पर्यावरणीय प्रदूषणाला हातभार लागतो. ऊसतोडणीनंतर () पाचट आच्छादनामुळे काही वेळा आंतरमशागतीय क्रियांमध्ये अडथळा येतो. नवीन पिकाच्या तुलनेत खोडवा उसाचे उत्पादन २५ ते ३० टक्के कमी होते. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेने बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र विकसित केले आहे. बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र मातीत खते देणे, बियाणे पेरणीसाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने मुळांचा जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची छाटणी करण्यासही फायदेशीर ठरणारे आहे.
बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र (Multi-functional khodwa drill machine) पीटीओ टरॅक्टरचलित (३५ ते ६५ अश्‍वशक्ती)आहे. यंत्र मातीत खते (१५ ते २० सेंमी खोली) आणि बियाणे (५ ते ७ सेंमी) सोडण्याव्यतिरिक्त इतर विविध कामे करते उदा. मुळांची छाटणी म्हणजेच जारवा तोडणे, पाचटावर माती टाकणे आणि ऊस बुडक्यांची छाटणी करणे.
यंत्राद्वारे होणारी कामे
बहू-कार्यान्वित खोडवा ड्रील यंत्र पाचटकुट्टी करून राखलेल्या खोडवा उसात एकाच वेळी पाच प्रमुख कामे करण्यासाठी योग्य आहेत. उसाची हाताने कापणी केल्यानंतर शेतात उरलेले असमान बुडखे, पृष्ठभागाजवळ एकसमान उंचीवर खूप वेगाने कापले जातात.
उभे ऑफ-बेरिंग डिस्क्स फावडे वाफ्याला बाहेरील बाजूंनी अर्धवट कापतात. कापलेल्या मातीला कुट्टी केलेल्या पाचटावर पसरवतात, जेणेकरून त्याचे विघटन वेगवान होईल.
ताज्या मुळांच्या वाढीस चालना देण्यासाठी खोडवा उसाच्या बाजूच्या जुन्या मुळांची छाटणी केली जाते. नव्याने विकसित झालेली मुळे उसाच्या सुरुवातीच्या वाढीस चालना देतात.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »