पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारले

0

पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारले

पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या संततधार पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ११) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. मागणी वाढल्याने भेंडी, गवार, वांगी, गाजर, घेवड्याचे दर १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 
कोल्हापूर, सांगलीत आलेल्या पूरस्थितीमुळे या दोन जिल्ह्यांसह कर्नाटकातून येणाऱ्या आवकीवर परिणाम झाला आहे. तर विभागातील पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांसह नाशिक आणि नगर जिल्ह्यांतून सुरळीत आवक होत आहे. विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून ५ ते ६ टेम्पो टोमॅटो, गुजरात आणि आंध्रप्रदेशातून ३ ते ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ ते ५ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ५ ते ६ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १००० ते १२०० गोणी, टॉमेटो सुमारे सात ते आठ हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी प्रत्येकी सुमारे ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० ते ६० गोणी, शेवगा ३ ते ४ टम्पो तसेच कांदा सुमारे १०० ट्रक इतकी आवक झाली होती.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »