Grape Season : व्यापाऱ्यांकडून हंगामाच्या अखेरीस द्राक्षाची शोधाशोध

0

Grape Season : व्यापाऱ्यांकडून हंगामाच्या अखेरीस द्राक्षाची शोधाशोध

कमी उपलब्धतेमुळे दरवाढ; प्रतिकिलो ३० रुपयांवर दर
मुकुंद पिंगळे : ॲग्रोवन वृत्तसेवा
नाशिक : गेल्या काही दिवसात द्राक्षांची उपलब्धता (Grape Avalibility) कमी झाल्याने व्यापाऱ्यांकडून माल शोधण्याची लगबग सुरू आहे. कमी उपलब्धतेमुळे दरात सुधारणा (Grape Rate) झाली आहे.
उशिराच्या बागांमधील द्राक्षांना ५० रुपये किलो दर अपेक्षित होता. मात्र आता ३० ते ३२ रुपये मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहापर्यंत रंगीत व काळ्या वाणांचे खुडे आटोपले. नंतरच्या टप्प्यात फक्त सफेद वाण काढणीसाठी होते. मात्र ७ ते १६ एप्रिल दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपिटीने दाणादाण उडविली.
निर्यातदारांनी खुडे थांबविल्यानंतर स्थानिक बाजारपेठेसाठी मागणी मंदावली. प्रतिकिलोला २५ रुपये खर्च येत असताना चांगल्या मालाला १० ते १२ तर बेदाण्याला २ ते ५ रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडला होता. मात्र आता दर वाढले आहेत.
अस्मानी संकटात नुकसान वाढल्याने खुडे बंद होऊन मनुके बनविण्याची नामुष्की ओढवली. अवघ्या दोन आठवड्यात कृषी विभागाने पंचनामे केल्यानुसार ३ हजार ४१० हेक्टर क्षेत्रावर बागांची धूळधाण झाल्याने २०० कोटींवर नुकसान वाढल्याची स्थिती आहे.
मालाच्या उपलब्धतेची स्थिती:
– जिल्ह्यात शेवटच्या १ ते २ टक्के मालाची काढणी शिल्लक
– प्रामुख्याने लांबट द्राक्ष वाणांची उपलब्धता तुरळक
– काही प्रमाणात निफाड, दिंडोरी, चांदवड, सिन्नर तालुक्यांत गोलाकार वाण उपलब्ध
– १० ते १५ रुपयांवरून थेट २५ ते ३५ रुपयांपर्यंत खरेदी
– पुढील आठवडाभर मालाची उपलब्ध राहण्याची शक्यता
– निफाड, सिन्नरसह नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात काही बागा शिल्लक
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »