Soluble Fertilizer Use : विद्राव्य खते वापरताना कोणती काळजी घ्यावी?

0

Soluble Fertilizer Use : विद्राव्य खते वापरताना कोणती काळजी घ्यावी?

विद्राव्य खताचा (Soluble Fertilizer) वापर केल्यामुळे पिकांना जलद गतीने अन्नद्रव्ये (Nutrients) मिळतात. अतिपाऊस किंवा पावसाचा मोठा खंड यामध्ये विद्राव्य खतांचा वापर फायद्याचा ठरतो.
पिके पानांद्वारे अन्नद्रव्ये शोषून घेतात. खताची नासाडी (Fertilizer waste) होत नाही. पीक फूल किंवा फलधारणा अवस्थेत असल्यावर याचा वापर फायदेशीर असतो. मात्र विद्राव्य खताचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी लागते. 
विद्राव्य खते वापरताना कोणती काळजी घ्यावी?
१) खते चांगली विरघळण्यासाठी पाणी स्वच्छ असणे गरजेचे आहे.
२) किलो खते व्यवस्थित विरघळण्यासाठी सरासरी १५ ते २० लिटर पाणी लागते.
३) ठिबक सिंचनाद्वारे खते गेल्यानंतर पुढे १० मिनिटे साधे पाणी जाऊ द्यावे. त्यामुळे लॅटरलमधील खते शेवटच्या रोपांपर्यंत पोहोचवता येतात.
४) दोन खते एकमेकांत मिसळताना त्याची शिफारस आहे का, किंवा ती एकमेकांना पूरक आहेत का, याची माहिती घेतल्यानंतर निर्णय घ्यावा.
५) खते देताना पिकाची अवस्था, वाफसा, वातावरण याचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे.
६) ठिबक सिंचनाचा वापर करत असताना फिल्टर, लॅटरल पाइप यांचा दाब योग्य आहे का, याची तपासणी करा.
७) सर्व ड्रीपर्स समान पातळीवर असणे गरजेचे आहे. यामुळे सर्व पिकाला योग्य प्रमाणात खते मिळतात.
८) ठिबक सिंचन संचात कोठेही लिकेज असता कामा नये. अन्यथा खते वाया जातात.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »