Soluble Fertilizer Use : फवारणीद्वारे विद्राव्य खते कशी वापरायची ?

0

Soluble Fertilizer Use : फवारणीद्वारे विद्राव्य खते कशी वापरायची ?

विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहे‏त.

अलीकडे बहुतांश शेतकरी ठिबक (Drip Irrigation) आणि अन्य सूक्ष्म सिंचन (Micro irrigation) पद्धतीचा वापर करू लागली आहेत. सुक्ष्मसिंचनातून आवश्यक अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी पाण्यात संपूर्ण विरघळणाऱ्या खतांचा (Soluble Fertilizers) वापर केला जातो.

अशा पाण्यात विरघळणाऱ्या अन्नद्रव्यांना विद्राव्य खते म्हणतात. त्यांच्या वापर ठिबक सिंचनासोबत फवारणीद्वारेही करता येतो.
विद्राव्य खते प्रामुख्याने फवारणीद्वारे दिल्याने जास्त फायदा होतो, कारण ती पिकांना लवकर उपलब्ध होतात. ही खते पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्यायची असतात. सध्या बाजारामध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली खते उपलब्ध आहे‏त.
फवारणीतून दिलेली खते जमिनीतून दिलेल्या खतांना पर्यायी होऊ शकत नाहीत. मात्र फवारणीतील खते अचानक निर्माण झालेल्या पानांतील अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतात.
या विद्राव्य खतांचा फावरणीद्वारे वापर कसा करायचा आणि फवारणी करताना कोणती काळजी घ्यायची याविषयी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
विद्राव्य खताचा फवारणीद्वारे वापर करताना…
पिकांची पाने अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. परंतु या पद्धतीने अन्नद्रव्यांचे शोषण फारच कमी प्रमाणात केले जाते. फवारणीद्वारे अन्नद्रव्ये देताना द्रावणातील अन्नद्रव्यांचे प्रमाण अत्यंत कमी असावे. अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर करताना पिकांवर नियमित व वारंवार फवारणी केली पाहिजे.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा फवारणीद्वारे वापर फळवर्गीय पिकांना जास्त उपयुक्त आहे.
फवारणी करताना काय काळजी घ्यावी?
द्रावणाची तीव्रता कमी ठेवून जास्त फवारण्या कराव्यात, परंतु जास्त तीव्रतेचे द्रावण कधीही करू नये.
फवारणीच्या वेळेस थेंबाचे आकारमान अत्यंत कमी असावे. म्हणजे थेंब पानांवर किंवा झाडावर पडताच चिटकला पाहिजे. थेंब मोठा असल्यास तो ओघळून जमिनीवर पडतो.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »