कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, शरद पवार चांदवड मध्ये कडाडले
कांदा परवडत नसेल तर खाऊ नका,
शरद पवार चांदवड मध्ये कडाडले
काजी सांगवी(वार्ताहर भरत मेचकुल): नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक कांदा आहे या वर्षी जिल्ह्यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे अशा परिस्थितीत नोव्हेंबर मध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गारपिटीने झोडपले आहे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अशा संकटात सापडलेल्या शेतकरी यात केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणे असा प्रकार कांदा निर्यात बंद करून केला आहे यामुळे शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी चांदवड मध्ये येऊन रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलन प्रसंगी चांदवड तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून असंख्य शेतकरी रस्त्यावर उतरला होता यावेळी शेतकरी अतिशय आक्रमक दिसला सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली मोदी हटाव देश बचाव या सरकारचं करायचं काय खाली वरती डोकं पाय राज्य शासनाच्या विरोधी घोषणाबाजी करण्यात आली का आंदोलनावेळी इंडिया आघाडीचे मित्रपक्ष काँग्रेस शिवसेना कम्युनिस्ट पक्ष हे सर्व सहभागी झाले होते आंदोलनाची सुरुवात कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथून करण्यात आली यावेळी हजारोंच्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आंदोलनात सहभाग घेऊन मुंबई आग्रा हायवे येथे जाऊन रास्ता रोको केला यावेळी प्रथमता प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉक्टर सयाजीराव गायकवाड यांनी शेतकऱ्यांविषयी श्री पवार साहेबांना माहिती देताना सांगितले की चांदवड तालुका हा सतत पाच ते सहा वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या संकटाला बळी पडत आहे गेल्या पाच-सहा वर्षांपासून शेतकरी अतिशय कर्जबाजारी होत चालला आहे शेतकऱ्यांकडे बँकेचे कर्ज भरण्यासाठी कुठल्याही प्रकारचा पैसा शिल्लक नाही यावर्षी शेतकऱ्यांनी शेती उभी करण्यासाठी घरातील लक्ष्मीचे सर्व दाग दागिने हे बँकेकडे गहाण ठेवून यावर शेती उभी केली होती परंतु पहिलेच कमी पावसाने शेतकऱ्यांची पिके जळून गेली गणपती मध्ये थोड्या प्रमाणात पाऊस झाला त्यात काही शेतकऱ्यांनी कांदे लागण केली काहींनी भाजीपाला केला तसेच द्राक्ष बागा उभ्या केल्या परंतु नोव्हेंबर मध्ये गारपीट होऊन यावेळीही शेतकरी उध्वस्त झाले आणि थोड्याफार शेतकऱ्यांचे कांदे शिल्लक राहिले तर केंद्र सरकारने असे शेतकरी विरोधी धोरण आणून कांदा निर्यात बंदी केली त्यामुळे आमचा शेतकरी हा संकटात सापडला आहे यातून साहेब तुम्ही आम्हाला सोडवा असे भावनिक उद्गार काढले जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड , डॉ .डी. एल . कऱ्हाड , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन आहेर , माजी आमदार शिरीष कोतवाल , माजी आमदार दिपीका चव्हाण , माणिकराव शिन्दे , माजी आमदार अनिल कदम , श्रीराम शेटे यांची भाषणे झालीत . नंतर माननीय शरदचंद्रजी पवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले .याप्रसंगी हे भाजप सरकार शेतकरी विरोधी कशी आहे हे सांगताना शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते तेव्हा कांद्याचे दर वाढले होते त्यावेळेस भाजपचे खासदार तसेच नेत्यांनी लोकसभेमध्ये कांद्याच्या माळा घालून शासनाचा निषेध केला होता कधीतरी शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळतो अशा वेळेस हे भाजप सरकार सतत शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव कसा होईल याच्यासाठी प्रयत्न करत असतो असे यावेळी पवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले केंद्र सरकारचा हा निर्णय शेतकरी उध्वस्त करणारा निर्णय आहे आम्हाला रास्ता रोको करण्याचे हाऊस नाही परंतु हा शेतकरी इतका संकटात सापडला आहे ते डोळ्यांनी बघवत नाही त्यामुळे पर्यायाने असे आंदोलन करावे लागते असे याप्रसगी नमूद करण्यात आले,
यावेळी माननीय पवार साहेबांनी कांद्याचे गणित सांगितले रोजच्या दैनंदिन जीवनात एका कुटुंबाला कांदा हा कमी प्रमाणात लागतो परंतु कांद्याचे थोडे दर वाढले कांद्याविषयी ओहपोह करता यावेळी श्री पवार यांनी आक्रमक शैलीत कांदा जर परवडत नसेल तर खाऊ नका आण्णा खाल्ला नाही तर काही त्रास होत नाही परंतु माझ्या शेतकऱ्याला दोन पैसे मिळू द्या असे ठणकावून सांगितले तसेच मी स्वतः उद्या दिल्लीला जाऊन मित्र पक्षांना सोबत घेऊन सरकारला हा विषय योग्यरीत्या सांगून यावर तोडगा काढण्यास भाग पाडील असे आश्वासन दिले केंद्र सरकारने नुकतेच इथेनॉल निर्मिती बंदच्या संदर्भात निर्णय घेतला त्याविषयी बोलताना श्री पवार यांनी याचा कारखानदारीला आणि शेतकऱ्यांना कसा फटका बसणार आहे हे सांगितले यामुळे उसाचे दर हे कमी होतील त्यामुळे शेतकऱ्यांना याही संकटाना सामोरे जावे लागेल त्यामुळे सरकारने या विषयी पण योग्य निर्णय घ्यावा असे संबोधित केले कोणतीही आंदोलन असो कांदे द्राक्ष ऊस तसेच भाजीपाला दूध आंदोलन करतेवेळी नाशिकचा शेतकरी हा यशस्वी आंदोलन करतो हे आपण बघत आलोय या आंदोलनाची पायाभरणी या जिल्ह्याला शरद जोशी यांनी घालून दिली आहे पहिले आंदोलन त्यांनी नाशिक मधूनच केले होते आणि ते यशस्वी झाले होते त्यानंतर नाशिक जिल्हा असो तसेच चांदवड तालुका असो यांचे आंदोलनाची दखल हे दिल्लीतील सरकारला घ्यावाच लागते असे याप्रसंगी श्री पवार यांनी नमूद केले
शिरीष कोतवाल झाले भावनिक
आंदोलन स्थळी भाषण करताना चांदवडचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल हे भावनिक झाल्याचे पहावयास मिळाले आपल्या भाषणामध्ये एका शेतकऱ्याची सत्य हकीगत सांगताना कोतवालांच्या डोळ्यात अश्रू आले काल विकलेले कांदे आणि निर्यात बंदी नंतर विकलेले कांदे यात झालेली तफावत यामुळे शेतकऱ्यांना होणारा तोटा हे नमूद करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले
रास्ता रोको आंदोलनास उत्तम बाबा भालेराव ‘ शिरीष कोतवाल ‘ माजी आमदार संजय चव्हाण, हेमंत धात्रक, जगन्नाथ धात्रक नितीन आहेर ,पुरूषोत्तम कडलग , विलास भवर , संजय जाधव , विजय जाधव , खंडेराव आहेर , अरूण न्याहारकर सुकदेव जाधव , प्रकाश शेळके -, अमोल भालेराव ‘ सचिन पाटील , आर .डी. थोरात , कैलास सोनवणे ,अनिल ठोके , विलास माळी,
साधना पाटील , भारती देशमुख , चित्रा शिंदे , दत्तात्रय वाकचौरे , शैलेश ठाकरे , अनिल पाटील , परशराम निकम , तुकाराम सोनवणे , रिजवान घासी , संदीप शिन्दे , ज्ञानेश्वर शिंदे , , नवनाथ आहेर , पुंजराम ठाकरे नरेंद्र ठाकरे, बबन ठाकरे, माणिक ठाकरे, बाबासाहेब ठाकरे , विक्रम जगताप ,विजय गांगुर्ड ‘ बबनराव ठोंबंरे ,साहेबराव चव्हाण,