Honey Production : साताऱ्याच्या रोहीणी पाटील यांची उत्कृष्ट मधनिर्मिती

0

Honey Production : साताऱ्याच्या रोहीणी पाटील यांची उत्कृष्ट मधनिर्मिती

सातारा जिल्ह्याची मधनिर्मितीतून स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात अनेक शेतकऱ्यांच्या हात आहे. यापैकीच रोहिणीताई पाटील एक. गेल्या नऊ वर्षांपासून रोहिणीताई मधनिर्मिती करत आहेत. त्यास प्रक्रियेची जोड देत ‘कृषिकन्या उद्योग समूह’ स्थापन करून मधाचे ब्रॅडिंग, पॅकिंग करत आहेत.
Beekeeping Update : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुका हा डोंगराळ भाग वनसंपदेने नटला आहे. तालुक्यातील नाडे-नवारस्ता गावातील रोहिणी प्रकाश पाटील या प्रयोगशील महिला शेतकरी. पती नोकरी करत असल्याने शेतीची संपूर्ण जबाबदारी रोहिणीताई पाहतात. कुटुंबाची दोन एकर शेती.
जमीनधारणा कमी असल्याने उत्पन्नवाढीसाठी त्यांनी शेतीपूरक व्यवसायाचा शोध सुरू केला. दरम्यान, बचत गट उभारणीसाठी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून मधमाशीपालनाला पाटण तालुक्यात चांगला वाव असून, बाजारपेठेतही संधी असल्याचे लक्षात आले.
त्यादृष्टीने रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचा अभ्यास सुरू केला. त्यासाठी ऐश्‍वर्यादेवी पाटणकर आणि रोहिणीताई यांच्यासह १४ महिलांनी मधमाशीपालनाचे रितसर प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणात मधमाशीपालनातील बारकावे, धोके, प्रक्रिया, संधी इत्यादी विषयी सविस्तर माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी व्यवसायास प्रारंभ केला.
रोहिणीताईंना व्यवसाय करताना मधमाश्‍या पेट्या भरणे ही प्रमुख समस्या असल्याचे जाणवले. यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मधमाश्‍या पेट्या स्वतः तयार करण्याचे ठरविले.
सुरुवातीच्या काळात नव्याने पेटी भरताना मधमाश्‍यांनी चावे घेतल्यामुळे चेहरा, त्वचेवर सूज यायची. तरी मोठ्या हिमतीने रोहिणीताईंनी मधमाशीपालनाचे काम सुरू ठेवले
राणीमाशी ओळखण्यापासून ते मधमाश्‍यांची वसाहत तयार करण्यास सुरुवात केली. मधमाश्यांची वसाहत यशस्वी झाल्यावर रोहिणीताईंनी स्वतःच्या ५० पेट्या गावाजवळील जंगलात ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात टप्प्याटप्प्याने यश मिळत गेले. जंगलात पेट्या ठेवल्यामुळे सेंद्रिय मध मिळण्यास मदत होते.
सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांत मधमाश्‍यांची वसाहत केली जाते आणि जानेवारीत जंगलात सावलीमध्ये पेट्या ठेवल्या जातात. पेट्ट्यांना मुंग्या लागू नये यासाठी विशेष काळजी घेतली जाते. फेब्रुवारी, एप्रिल महिन्यांत पेटीतील मधाचे संकलन केले जाते.
सुरुवातीच्या काळात वर्षभरात २०० किलो मध उत्पादन मिळाले. त्यानंतर त्यात वाढ होत गेली. सध्या वर्षाकाठी ३०० ते ४०० किलो मधनिर्मिती होते. एका पेटीतून एका वर्षात सरासरी ७ किलो मध मिळतो.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »